कोपरगांव । झुंजार न्यूज
कोपरगाव शहराला विकासात्मक दृष्टीने जिल्ह्यात एक नंबर बनवण्यासाठी बनविणार असल्याचा निर्धार आमदार आशुतोष काळे यांनी केला .
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या संकल्पना व सूचना जाणून घेण्यासाठी आज कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे ‘संवाद कोपरगावच्या विकासाचा’ कार्यक्रम पार पडला प्रसंगी आ काळे बोलत होते .
यावेळी कोपरगाव शहरातील व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, नोकरदार व सामान्य नागरिकांनी कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मनात असलेल्या संकल्पना मांडल्या.
यावेळी आ . काळे म्हणाले की , कोपरगाव शहराचा जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न सुटत असून लवकरच नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळणार आहे. शहरातील रस्ते, समाजमंदिरे, व्यापारी संकुले, गटारी, सुशोभीकरणे आदी कामांसाठी भरघोस निधी आणला असुन त्यातुन बहुतेक कामे झाली आहेत तसेच काही कामे सुरु असून काही लवकरच सुरु होणार आहेत. या कामांसह कोपरगाव शहराचा नियोजनबद्ध विकास करून आपले कोपरगाव जिल्ह्यात एक नंबर करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा नक्की गांभीर्याने विचार केला जाईल याची मी शाश्वती देतो. तसेच कोपरगाव जिल्हा होण्यासाठीही माझे प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी कोपरगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
