कोपरगांव । झुंजार न्यूज

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा तळागाळापर्यंत पोहचला असून राज्याच्या नव्हे तर देशातील प्रत्येक गांवामध्ये रामदास आठवले यांचा कार्यकर्ता  कार्यरत असून आता रिपब्लिकन पक्ष हा मजबूत झाला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामधुन पक्षाची कामगिरी चांगली दिसणार असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा कायदेशिर सल्लागार अॅड बी के बर्वे यांनी मांडले .

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रिय संघटन सचिव तथा कायदेशीर सल्लागार तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विश्वस्त ऍड. मा.श्री.बी.के. बर्वे यांनी सपत्नीक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव तथा समाजभूषण दिपकराव गायकवाड यांच्या जेऊर कुंभारी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी जेऊर कुंभारी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर प्रसंगी आर पी आय शाखेचे वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, बाळासाहेब पगारे, किसन गायकवाड, सुनिल खरात, कुंदन पठारे, दामोधर गायकवाड, विलास धीवर, अशोक पोटे, आर पी आय शाखा जेऊर कुंभारी व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, संघटक निलेश शिंदे, स्वप्नील भालेराव, पिलू गायकवाड, रवि पवार, अजय गोरसे,अजय पवार आदींसह कार्यकर्त उपास्थित होते.*

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed