संगमनेर । झुंजार न्यूज

जिवनामध्ये रेषांचे महत्व अनन्यसाधारण आहे. रेषांतून तयार झालेली कलाकृती माणसातील अव्यक्त भावना व्यक्त करते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व व्यंग चित्रकार अरविंद गाडेकर यांनी संग्राम निवासी मूक-बधिर विद्यालयात श्रींच्या आरती प्रसंगी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना कमीत कमी रेषांच्या माध्यमातून व्यंगचित्र रेखाटण्याचे प्रशिक्षण दिले विद्यार्थी व शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यातून विदयार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये संगमनेर येथील सुप्रसिध पोखरकर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक प्रमोदजी पोखरकर म्हणाले देव मंदिरात शोधण्याची गरज नसून दिव्यांग विदयार्थ्यांमध्ये घालविलेल्या वेळेत मला परमात्म्याची अनुभूती प्राप्त झाली. या कार्यक्रम प्रसंगी या विदयार्थ्या साठी अद्ययावत वॉशिंग मशिन देण्याचे आश्वासन दिले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल कवडे सर यांनी आभार मानले तर अर्चना मुन्तोडे यांनी सुत्रसंचलन केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *