संगमनेर । झुंजार न्यूज  

 जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान घोषणाचे  प्रणेते   लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज काँग्रेस कमिटीच्या वतीने यशोधन कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी अमृतवाहीनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी , नवनाथ आरगडे , बाबा खरात , सुरेश झावरे , त्रिंबक गडाख, यशोधन कार्यालयाचे प्रमुख श्रीराम कुऱ्हे , तात्यासाहेब कुटे , बाळासाहेब उंबरकर , पुंजाहारी दिघे , संजय कोल्हे ,महेश वाव्हळ, शिवाजी अरगडे ,बाळासाहेब हांडे ,सुरेश भांबळे ,मुन्ना सय्यद, लक्ष्मण गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते 
     
याप्रसंगी सुधाकर जोशी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना म्हणाले की , जगाच्या इतिहासामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोठे योगदान असून गांधीजींचा अनेक स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुष यांनी केलेल्या त्यागातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाच्या विकासात लोकशाही महत्त्वाची ठरली असून शांतता व सत्य अहिंसाचे तत्व हे भारतालाच नव्हे तर जगाला दिशादर्शक ठरले आहे. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे थोर देशभक्त होते. स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शास्त्रीजींनी 1965 च्या भारत पाकिस्तान विजय मिळवून दिला. या दोन्हीही महान विभक्तींचे जीवन कार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी मुळे भारताची ओळख निर्माण झालेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संपूर्ण जगाचे शांतिदूत असून महात्मा गांधीजींच्या विचाराचा सर्व तरुण पिढींनी अनुकरण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed