संगमनेर । झुंजार न्यूज

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सांगता समारंभ “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपचायतीच्या वतीने स्वातंत्रदिनी जिल्हा परिषद मुलांची शाळेत विविध मान्यवर यांच्या हस्ते “शिलाफलक” अनावर व तसेच २१ आजी – माजी सैनिकांचा स्मृती चिन्ह , आंब्याचे वृक्ष व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला हा अनोखा कार्यक्रम प्रभारी संरपच सुनिल मुन्तोडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याने आजी – माजी सैनिक सत्काराने भावूक झाले . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पचायत समिती माजी सदस्य तबाजी मुन्तोडे होते तर विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक आण्णासाहेब म्हस्के , जेहूरभाई शेख , ग्रामसेवक सुरेंद्र ब्राम्हणे , अशोकराव वालझाडे , शिवाजी मांढरे , जगन्नाथ मांढरे , प्रमोद बोंद्रे , प्रकाश शिंदे , विजय मुन्तोडे , नारायण बोंद्रे , भिमाजी बोंद्रे , दिपक रक्टे , सचिन गायकवाड , लता नागरे , शुभांगी रक्टे , करुणा मुन्तोडे , अनिता म्हस्के , यमुना नागरे , शाळेचे मुख्याध्यापिका सौ भुसाळ , प्रवरा विदयालयाचे मुख्याध्यापक उंबरकर आदींसह शिक्षक , ग्रामस्थ व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

 यावेळी उभारण्यात आलेल्या शहिदांचे शिलाफलक मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येवून त्यावर पंतप्रधानांचा श्रद्धांजली संदेश,अभिवादन संदेश लिहिण्यात आला आहे. शिलाफलक अनावरणांतर पंचप्रण शपथ कार्यक्रम पार पडला तर मान्यवरांच्या हस्ते २१ आजी – माजी सैनिकांचा ( स्मृती ) सन्मान चिन्ह , आंब्याचे रोप व श्रीफळ देवून येतोचित सत्कार करण्यात आला. 

 चौकट 

आपले जीवन धोक्यात घालून देशसेवा करणार्‍या आजी – माजी सैनिकाचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून केवळ सत्कारचं नव्हेतर त्यांच्या आठवणीत रहावे म्हणून पंतप्रधानाच्या संदेशांचे स्मृतीचिन्ह देवून त्यांच्या नावानिशी जि प शाळेच्या प्रांगणात २१ आंब्याचे वृक्षरोपन करण्यात आले हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे भाग्य लाभले .
सुनिल तबाजी मुन्तोडे ( प्रभारी संरपच , शिबलापूर ) 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed