संगमनेर । झुंजार न्यूज
भारतीय मानक संस्था, पुणे व रयत स्टँडर्डस क्लब लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शैक्षणिक संकुल, लोणी येथे मानक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य अशा मानक गीताने झाली. स्टँडर्डस क्लबच्या विद्यार्थ्यांनी सोने खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकी संदर्भात जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. यानंतर जागतिक मानक दिनानिमित्त प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये विद्यालयातील स्टँडर्डस क्लबच्या 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये यादव पंकज राजू याने प्रथम क्रमांक, यश साहेबराव टपळे याने द्वितीय क्रमांक, वन्नम दर्शन विक्रांत याने तृतीय क्रमांक तर कानडे तेजस संजय याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. BIS, पुणे यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
याप्रसंगी राहाता तालुका गटशिक्षणाधिकारी मा. राजेश पावसे साहेब यांनी अध्यक्षीय मनोगतात ’21व्या शतकातील जीवनकौशल्य आत्मसात करताना स्टँडर्डस क्लब सारखे उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल’ असे मत व्यक्त केले. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त मा. प्रभाताई घोगरे पाटील यांनी “सामान्य जनतेच्या फसवणूक होऊ नये यासाठी स्टँडर्डस क्लब च्या माध्यमातून समाजाला -मानक साक्षर करा” असा संदेश दिला. तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. रक्टे एल. सी. सर यांनी ‘Standerds क्लब चे mentor व सर्व क्लब च्या सदस्यांनी BIS चे हे समाजोपयोगी कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सक्षम समाज निर्मितीसाठी हातभार लावावा.’असा संदेश दिला. याप्रसंगी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस, पुणे च्या सहाय्यक संचालिका मा. श्रीम. निशा कंबार्गी (शास्त्रज्ञ-D) यांनीही BIS, स्टँडर्डस क्लब, हॉलमार्क, HUID नंबर याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम. कडू मॅडम, श्रीम. अर्चना विखे – उपसरपंच, ग्रामपंचायत लोणी खुर्द, ग्रामपंचायत सदस्या-सुनीता कोरडे, पत्रकार श्री. सोमनाथ डोळे, प्रा. श्री. कडू सर व श्री. काळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील स्टँडर्डस क्लब चे मेंटर श्री. वऱ्हाडे जी. डी. सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. दाभाडे मॅडम यांनी केले तर विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री. किरवे सर यांनी आभार मानले.
