संगमनेर । झुंजार न्यूज
नेकचा ए प्लस दर्जा असलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए मध्ये प्रथम वर्ष मधील बारा विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीत 5.68 लाखांच्या पॅकेजवर थेट नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ व्यंकटेश म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवत्तेच्या A प्लस दर्जासह राष्ट्रीय पातळीवर आपला गौरव निर्माण केला आहे. स्वच्छ व सुंदर परिसर, शिस्त, अत्याधुनिक सुविधा ,नोकरीसाठी सुविधा यामुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र ठरले आहे .
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कौशल्य ओळखून औद्योगिक बँकिंग सर्विस अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते .कॉलेजमध्ये विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कडून कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन होत असून यामधून प्रथम वर्षात शिकत असलेल्या बारा विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स लिमिटेड या कंपन्यांमध्ये 5.68 लाखाचे पॅकेज देऊन त्यांची निवड झाली आहे .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कार्पोरेट जगाच्या विविध वाटा मोकळ्या करून देण्यात अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने महत्त्वाचा वाटा उचलला असून आत्तापर्यंत 41 विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्यू साठी निवड झाली आहे .यामध्ये स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया, इंडिया मार्ट केअर हेल्थ इन्शुरन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक ,डीसीबी बँक, बिग बास्केट, स्टेट इन सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
द्वितीय वर्षाच्या परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांची थेट कंपनीमध्ये नोकरी मिळणार आहे.
या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ व्यंकटेश, विभाग प्रमुख प्रा डॉ.वृषाली साबळे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
चौकट
अमृतवाहिनीतील गुणवत्ता व नियोजन अनुकरणीय- डॉ. कुलकर्णी
चाळीस वर्षाची उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने स्वच्छता ,शिस्त ,उत्कृष्ट प्लेसमेंट , प्रसन्नता व हिरवाईचे वातावरण ,विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा देताना विद्यार्थ्यांसाठी मेधासह विविध उपक्रम राबवले आहेत. अत्यंत चांगले आयोजन, नियोजन याचबरोबर चांगल्या कामामुळे अहमदनगर, नाशिक ,पुणे या तीन विभागांच्या स्वररंग कार्यक्रमाची जाणीवपूर्वक जबाबदारी अमृतवाहिनी दिली असून त्यांनी केलेल्या चांगल्या नियोजनामुळे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळाली असल्याचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी या विद्यार्थ्यांचा गौरव करताना म्हटले आहे
