संगमनेर । झुंजार न्यूज
याबाबत अधिक माहिती देताना डॉ पाटील म्हणाले की, एसएमबीटी दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत .उच्च वैद्यकीय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही महाविद्यालय सर्व विभागीय स्तरावर उपक्रमांमधून सहभाग नोंदवला जात आहे .नाशिक येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल स्पर्धेमधून एसएमबीटी दंत महाविद्यालयाच्या कल्पेश नवले, समृद्धी वाणी व कोमल राक्षे या तीन विद्यार्थ्यांची जळगाव येथील शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे होणाऱ्या अंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी डॉ सुयोग साखरे व क्रीडा संचालक प्रा पंकज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,व्यवस्थापकीय संचालक डॉ हर्षल तांबे, प्राचार्य डॉ अशोक पाटील यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे
