उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा; १५ हृदय शस्रक्रिया तज्ञांची उपस्थिती

नाशिक



उत्तर महाराष्ट्रातील सर्वात  अत्याधुनिक आणि अद्ययावत समजल्या जाणाऱ्या एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अनेक क्लिष्ट शस्रक्रिया केल्या जात आहेत. नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रोव्हस (ROVUS) म्हणजेच अन्जिओप्लास्टीशी निगडीत रोटा (ROTA) आणि आयव्हस (IVUS) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ गौरव वर्मा यांनी उपस्थित हृदयरोग तज्ञांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती आली. डॉ सुरेश पाटील व डॉ महेश अहिरे यांनी प्रत्यक्ष सहभाग यावेळी घेतला. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील १५ नामवंत हृदयरोग तज्ञांची उपस्थिती होती.

या प्रकारच्या अॅन्जिओप्लास्टीसाठी अधिक खर्च येतो शिवाय प्रत्येक हृदयविकार तज्ञ त्यांच्या कॅथलॅबमध्ये करू शकत नाहीत. त्यामुळे एसएमबीटीचा हृदयविकार विभाग योग्य पर्याय असून याठिकाणी मोफत या प्रक्रिया केल्या जात आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरत दररोज नवनवीन संशोधने होत आहेत. काळानुसार बदल आत्मसात करत एसएमबीटी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत दर्जेदार आरोग्यसुविधा देत आहे. नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून  एसएमबीटीचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे. येथील हार्ट इन्स्टिट्यूट उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत समजले जाते. याठिकाणी अत्याधुनिक कॅथलब आहे. येथील ऑपरेशन थियेटर्स अतिशय अत्याधुनिक आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार उपलब्ध झाले आहेत. हृदयातील कॅल्शियमचे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी अॅन्जिओप्लास्टीमध्ये अनेक नवनवीन संशोधने झाली आहेत. यातीलच नवा आयाम म्हणून रोटा (ROTA) आणि आयव्हस (IVUS) कडे बघितले जाते.

रोटा (ROTA) प्रकारात एक अत्याधुनिक मशीन हृदयाच्या धमनीमधील कडक झालेले कॅल्शियमच्या ब्लॉकेजेसचा अडसर दूर करून रक्तवाहिनी रक्तपुरवठ्यासाठी पूर्ववत करतात. तर आयव्हस (IVUS) तंत्रज्ञानाने मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या हृदयातील परिस्थितीचे छायाचित्रे काढली जातात. त्यामाध्यमातून डॉक्टर उपचार करतात. या दोन्हीही तंत्रज्ञाने केल्या जाणाऱ्या अॅन्जिओप्लास्टीचे प्रशिक्षण याप्रसंगी डॉ वर्मा यांनी उपस्थित हृदयरोग तज्ञांना दिले.याप्रसंगी हृदयरोग तज्ञांच्या शंकांचे निरसनदेखील त्यांच्याकडून करण्यात आले.

नागरिकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करावा, हा मुळ हेतू एसएमबीटी हॉस्पिटलचा आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू असताना स्थापनेपासून ते आतापर्यंत रुग्णांना अद्यावत, दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात हॉस्पिटल प्रशासन यशस्वी ठरले आहे. नागरिकांना ह्रदयासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ नयेत अथवा त्या झाल्यास त्यावर योग्य पद्धतीने तात्काळ उपचार व्हावेत, हार्ट इन्स्टिट्यूट कार्यान्वित करण्यामागचा उद्देश आहे. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी एसएमबीटी हॉस्पिटल संलग्न असल्याने या योजनेच्या माध्यमातून हृदय शस्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत केले जात आहेत.

सर्वात अद्ययावत हार्ट इन्स्टिट्यूट

एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट प्रामुख्याने दोन प्रकारात विभागले गेले आहे. यात कॅथलॅब आणि सीव्हीटीएस असे हे दोन विभाग आहेत. इतर ठिकाणी ज्या क्लिष्ट शस्त्रक्रिया त्यांच्या कॅथलॅब आणि डॉक्टरांकडून होत नाहीत त्या शस्त्रक्रिया आपण एसएमबीटी हार्ट इन्स्टीट्युटमध्ये करतो आहोत.  कॅथलॅबमध्ये ईसीजी, 2डी इको, टीएमटी,  ॲन्जीओग्राफी,अद्ययावत ॲन्जिओप्लास्टी, बलून प्रोसिजर, पेसमेकर, इम्प्लांट तर सीव्हीटीएस मध्ये बायपास शस्त्रक्रिया, ह्रदयाचा व्हॉल बदलणे, व्हॉल दुरुस्ती, यावर प्रामुख्याने उपचार केले जातात.
 
डॉ. गौरव वर्मा, विभागप्रमुख, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

आजची कार्यशाळा खूप चांगली झाली. हा अनुभव अविस्मणीय आहे सोबतच दैनंदिन कामकाजात यामुळे फायदा नक्की होईल. क्लिष्ट अँजीओप्लास्टी करताना यामुळे मार्गदर्शन नक्की मिळेल. यापुढेही एसएमबीटीच्या तज्ञ डॉक्टरांकडून नवनवीन आयाम अनुभवता येतील यात शंका नाही.


डॉ अमोल पाटील, हृदयविकारतज्ञ जळगाव

या सीएमईचा खूप फायदा होणार आहे.  डॉ वर्मा यांनी खूप छान पद्धतीने रोटा आणि आयव्हस या तंत्रज्ञानाला समजून सांगितले.

डॉ. सुदाम झरे, हृदयविकर तज्ञ अहमदनगर

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *