संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक व फटाके मुक्त दिवाळी साजरी केली .

‘ पर्यावरण पुरक व फटाके मुक्त दिवाळी ‘ हा संदेश ग्रामस्थांना देत दिवाळी निमित्ताने भेटकार्ड ,  फटाक्यांऐवजी पुस्तक द्या असे आवाहन केले.   
यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी व विदयार्थ्यानी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. फटाकेमुक्त दिवाळी बद्दल जाणीव जागृती केली .
यावेळी विदयार्थ्यानी मोठया आनंदात व उत्साहात ‘फटाके नको फोडायला, पुस्तके दया आम्हाला’..’चला करू या, फटाकेमुक्त दिवाळी साजरी’ अशा घोषणा देवून प्रबोधन केले. विदयार्थ्यांनी स्वत: तयार केलेले ग्रिटींग कार्ड पालकांना व ग्रामस्थांना भेट देऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विनंतीपूर्वक आव्हान केले. 
अशा प्रकारे प्रबोधन करण्याची कल्पना स्कूलचे प्राचार्य शेख व शिक्षकांना सुचली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजय सांगळे यांनी मोलाची साथ दिली. विदयार्थ्यांनी गावकर्यांना दिवाळीच्या शुभेच्छांसह पर्यावरण पुरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच फटाक्यांऐवजी पालकांनी आपल्या मुलांना पुस्तक देण्याचे विनंती केली. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *