संगमनेर । झुंजार न्यूज

 

आळंदी कडे निघालेल्या शिर्डी येथील दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनी विखे पाटील यांनी भेट घेवून दिवासा दिला.

 

जखमी रुग्णांचे सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रीपोर्ट प्राप्त झाल्यानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू असून आज सौ.विखे पाटील यांनी जखमीच्या उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली.

 

या सर्व रुग्णांवर कोणताही अर्थिक भार येवू देवू नका, उपचारांचा सर्व खर्च मंत्री विखे पाटील यांनी करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले

 

आळंदी यात्रेकरीता शिर्डी येथून निघालेल्या दिडींला संगमनेर तालुक्यात अपघात झाल.या अपघातात जखमी झालेल्या वारकर्यांना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.या जखमी रूग्णांना सौ.विखे पाटील यांनी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून दिलासा दिला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed