दुष्काळी जनतेसाठी आमदार थोरात हेच जलनायक

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांसाठी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण झाले. हे पाणी याच भागाला मिळावे याकरता आमदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांमधून मिळालेल्या डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे अनेक दुष्काळी गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण झाली आहे. 182 गावांसाठी आमदार बाळासाहेब थोरात हेच जननायक असल्याची प्रतिक्रिया विविध गावांमधून येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती संगमनेर तालुका हा कायम दुष्काळग्रस्त असून तळेगाव भागातील अनेक गावे ही दुष्काळाशी सामना करत असतात या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे याकरता आमदार थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली याचबरोबर तळेगाव विभागातील सोळा गावांकरता प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही सुरू केली आहे त्यामुळे प्रवरा नदीचे पाणी थेट देवकौठेपर्यंत पोहोचते आहे.सामुदायिक पाणीपुरवठा योजने करता अनेक अडचणी असून इंद्रजीत भाऊ थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या प्रयत्नातून सातत्याने यातून मार्ग काढत ही प्रादेशिक योजना यशस्वीपणे चालवली जात आहे.

दुष्काळी जनतेला दिलासा मिळावा याकरता आमदार थोरात यांनी सरकारकडे पाठपुरावा करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. यावर सरकारने दखल घेत या भागाकरिता पाणी सोडले असून यामुळे संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील पोखरी हवेली,सुकेवाडी,खांजापुर,निळवंडे, कवठे कमळेश्वर,लोहारे, कासारे, तळेगाव, चिंचोली गुरव, देवकौठे कोकणगाव, मिरपुर यांसह राहता,कोपरगाव तालुक्यातील विविध  गावांमध्ये मिळालेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर निळवंडी धरणाचे पाणी या धरणाचे व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळाले आहे यामुळे सर्व गावांमध्ये जलसमृद्धी आल्याचे चित्र निर्माण झाल्याने नागरिक अहवाल वृद्धांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे.

आ.थोरात यांच्यामुळे दुष्काळी भागाला पाणी – ज्ञानेश्वर मुंगसे

निळवंडे धरण व कालव्यासाठी अहोरात्र काम करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून सर्व दुष्काळी भागात पाणी आल्याचे वेगळे समाधान आहे ही खऱ्या अर्थाने तळेगाव भागासाठी दिवाळी ठरली असल्याचे देवकवठे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे यांनी म्हटले आहे.

अडथळ्यांची शर्यत पार करून आ थोरात यांनी पाणी आणले – सचिन दिघे

निळवंडे धरण दुष्काळी भागाकरता केले असे आमदार थोरात यांनी वारंवार सांगितले त्यांच्या प्रयत्नातून तळेगाव भागात पाणी आले मात्र काही शक्तींनी या भागाला पाणी मिळू नये म्हणून सत्तेचा गैरवापर करत पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार थोरात यांनी सर्व अडथळ्यावर मात करून या दुष्काळी भागात पाणी आणले असल्याची प्रतिक्रिया शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी दिली आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *