संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील अमृतवाहिनी आय. टी. आयच्या चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमासाठी निवड झाल्याची माहिती आय.टी.आयचे प्राचार्य संभाजी देशमुख यांनी दिली. या उपक्रमामार्फत सदर विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टच्या कल्पनेचे सादरीकरण श्री. छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती, अ.नगर येथे झाले.
या साठी अमृतवाहिनी आय. टी आय अमृतनगरचे १) भडांगे रोहित सुभाष (वायरमन) २) नालकर वैभव बाळासाहेब (मेकॅनिक मोटर व्हेईकल) 3) राऊत तेजस बाळासाहेब (मेकॅनिक मोटर व्हेईकल) ४) रोकडे मंगेश रविंद्र (मेकॅनिक मोटर व्हेईकल) 5) गडगे अतुल संतोष (इलेक्ट्रिशियन) या विद्यार्थ्यांची निवड झाली.
या निवडीबद्दल विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, विश्वस्त शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ, अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
