शिबलापूर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील प्रवरा माध्यमिक विदयालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह मान्यवर , पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांसह भाजी पाला विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

 

 पदमश्री डॉ विखे पाटील कारखान्याचे संचालक आण्णासाहेब म्हस्के , पचायत समिती माजी सदस्य तबाजी मुन्तोडे , कारखान्याचे माजी संचालक जेहूरभाई शेख माजी उपसंरपच राजेंद्र नागरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तर पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील , पदमभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. 

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे असल्याचे स्कूल कमिटी अध्यक्ष आण्णासाहेब म्हस्के म्हणाले .

 

यावेळी पदमश्री कारखान्याचे संचालक आण्णासाहेब म्हस्के , प स माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे , माजी संचालक जेहूरभाई शेख , माजी उपसंरपच राजेंद्र नागरे , पत्रकार राजेंश गायकवाड , पिंप्री हायस्कूलचे मुख्याध्यापक शिंदे , मेहेरे , सोसायटी चेअरमन भिमाजी बोंद्रे , प्रकाश शिंदे , गीते , बाबासाहेब म्हस्के , वाणी , रविंद्र मुन्तोंडे , बाबासाहेब मुन्तोंडे , शब्बीर मोगल मुख्याध्यापक एस आर उंबरकर आदीसह पालक , ग्रामस्थ उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक एस आर उंबरकर , एम एन गायकवाड , एस जी पोफळे , एस पी तांबे , एस पी देशवंडीकर , डी एन फड , पी टी इलग , सौ जे डी फड , सौ जे जे जोंधळे , सौ एस एस सानप , व्ही एम वाघ , झेंड एम घेडे , बी बी बैरागी , ए एस वालझाडे यांनी परिश्रम घेतले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *