पिंप्री लौकी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय मध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मुंढे यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी आपले प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटील गिते यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी आणि स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री रामदास पाटील दातीर , ज्येष्ठ सदस्य श्री भाऊसाहेब पाटील लावरे , विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सिताराम पाटील दातीर , गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या बाल आनंद मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक वृंद व समस्त ग्रामस्थ पिंप्रीं लौकी अजमपुर यांचे विशेष सहकार्य लाभले. अतिशय उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात हा बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
