वरवंडी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्याच्या पठारावरील वरवंडी येथे सप्तश्रृंगी देवीची मुर्ती स्थापना नुकतीच मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

वरवंडी गावात राहत असलेले पाटोळे कुटुंब ‌सुमारे तिनं पिढ्यांपासून सप्तश्रृंगीच्या सेवेत असुन ते राहत असलेल्या जागी पुर्वीपासुनच देवीचे स्थान होत.पाटोळे कुटुंबातील नवनाथ लक्ष्मण पाटोळे हे काही वर्षांपासून सेवेदार आहे.त्यांच्या पत्नी सौ.सविता नवनाथ पाटोळे.यांना ‌एकदा अचानक देवीचा साक्षात्कार झाला असे त्यांचे म्हणणे आहे.म्हणून त्यांनी त्याठिकाणी भव्य मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.हे मंदीर जमिनीपासून सुमारे ३३ फूट उंच आहे.मंदिराचे बांधकाम आबासाहेब महादू वर्पे यांनी अल्पावधीतच पूर्ण केले.

 

 

संगमनेर तालुक्यातील नान्नज पिंपळे येथील मुर्तीकार कारभारी खेमनर यांनी ही मूर्ती २.५ उंच व २ फूट रुंद अशी बनविली असून मूर्तीला १८भूज व आठरा हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र व देवीला सर्पावर विराजमान करत सुंदर व सुबक असा आकार दिला आहे.

 

मुर्ती स्थापना मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.यावेळी भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचा आनंद मिळाला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed