लोणी । झुंजार न्यूज

 

‘लोकशिक्षण आणि समाजप्रबोधन’ या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील २३ वी स्मृति व्याख्यानमाला यावर्षी सोमबार दि.१ जानेवारी ते शनिवार दि. ६ जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये आयोजन लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी पञकार परिषदेत दिली.

 

महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आणि विचारवंतानी या व्याख्यानमालेत यापुर्वी उपस्थिती दाखवून या व्याख्यानमालेची उंची वाढवलेली आहे. व्याख्यानमाला समाजभिमुख आणि प्रबोधनात्मक असावी असा प्रयत्न नेहमीच सयोजकांचा राहीला असल्याचे स्पष्ट करून सौ.विखे पाटील म्हणाल्या की, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता होत असलेल्या या वर्षीच्या व्याख्यानमाले मध्ये यंदाच्या वर्षी सोमवार दि.१ जानेवारी रोजी प्रसिध्द व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेचे उ‌द्घाटन होत असून कार्यक्रमास महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत.

 

मंगळवार दि.२ जानेवारी रोजी पुणे येथील प्रसिध्द उद्योजक श्री.सतीश खाडे यांचे ‘सगळे जग टायटॅनिकचे प्रवासी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दि.३ जानेवारी रोजी ठाणे येथील प्रसिध्द निरुपकार ह.भ.प. जगन्नाथ पाटील यांच्या ‘ज्ञानेश्वरी आणि आजचे जीवन’, गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी अहमदनगर येथील प्रसिध्द व्याख्याते व कथा कथनकार डॉ.संजय कळमकर यांचे ‘स्वामी विवेकानंद आणि आपण’ शुक्रवार दि.५ जानेवारी रोजी पुणे येथील निवृत्त शिक्षण अधिकारी श्री. अनिल गुंजाळ यांचे ‘चला आनंदाने जगूया या विषयावर व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमालेचा समारोप शनिवार दि.६ जानेवारी रोजी राहुरी येथील युवा प्रबोधनकार प्रा.जितेंद्र मेटकर यांचे ‘विश्वनेतृत्वाच्या दिशने… श्री नरेंद्र मोदी’ या व्याख्यानाने होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तर संयोजन समितीचे अध्यक्ष डाॅ.राजेंद्र विखे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजप्रबोधनाच्या प्रमुख हेतूने सुरु करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेस परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, शिक्षक भादि समाजातील सर्व स्थरातील नागरीकांनी उपस्थित राहावे व व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.शालीनी विखे पाटील यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्तत मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका सौ.विद्याताई वाजे, अभियांञिकीचे प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाणे,शिक्षणशास्ञ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.विद्याताई वाजे,विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.आर ए.पवार,डाॅ.अनिल वाबळे,डाॅ.शांताराम चौधरी आदी उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed