2024 हे सर्वांना आरोग्यदायी जावून प्रत्येकाची संकल्पपुर्ती व्हावी – आमदार थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज

 

येणाऱ्या नवीन २०२४ या वर्षांत प्रत्येकाची संकल्पपुर्ती होऊन प्रत्येकास हे नवीन वर्षे आरोग्यदायी,आनंदाचे व यशस्वी जावो अशा शुभेच्छा विधिमंडळ पक्षनेते तथा मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेला दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना ते म्हणाले कि, भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असतो. मागील वाईट आठवणी सोडून प्रत्येकाने सकारात्मक विचार जोपासत काम करावे. मागील वर्षीच्या चांगल्या आठवणी आणि अनुभवातून नवीन ऊर्जा घेत येणाऱ्या वर्षात प्रत्येकाची संकल्प सिद्धी होवो. मानवता व बंधूता हीच मोठी ताकद असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. आरोग्याचे महत्व अनन्य साधारण असून प्रत्येकाने स्वःतची काळजी घ्या. तसेच नववर्षात प्रत्येकाने एक चांगला संकल्प करुन सामाजिक बांधिलकी ठेवत राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे..राज्याच्या व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेऊन सर्वांनी काम करावे. येणाऱ्या नवीन २०२४ या वर्षांत प्रत्येकाची संकल्पपूर्ती होऊन प्रत्येकास हे नवीन वर्ष आरोग्यदायी,आनंदाचे व यशस्वी जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या


————————————————————————————————–

आगामी २०२४ या नवीन वर्षात प्रत्येकास आरोग्य,समृध्दी लाभावी : डॉ सुधीर तांबे 

धावपळीच्या जिवनात मानसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून चांगले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आगामी २०२४ या नवीन वर्षात प्रत्येकास आरोग्य,समृध्दी लाभावी. तसेच प्रत्येकाच्या हातून पर्यावरण रक्षण,स्वच्छता या बरोबर राष्ट्रहितासाठी काम व्हावे. नवीन वर्षात प्रत्येकाने चांगला संकल्प करुन सकारात्मक विचार वाढीस लावावा त्यासाठी प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी अशा शुभेच्छा मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed