संगमनेर । झुंजार न्यूज
1) आ.सत्यजित तांबे हे 2 फेब्रु. 2023 रोजी मोठ्या मताधिक्याने नाशिक पदवीधर मतदार संघामधून विजयी
—–
2) 5 फेब्रुवारी रोजी ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेशाही हा भव्यदिव्य कार्यक्रम संगमनेर मध्ये संपन्न झाला. यावेळी आजारपणानंतर ना .थोरात साहेब यांचे स्क्रीनवरून दोन महिन्यानंतर दर्शन झाल्याने संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले
———
3) ना. थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँक आणि शेतकी संघ यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकत विरोधकांचे पानीपत केले
——
4) शिर्डी मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत दैदीप्यमान ऐतिहासिक विजय.
———–
5) निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते ना. थोरात साहेब यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यात 4 जून 2023 रोजी पिंपळगाव कोंझिरा येथे निळवंडे धरणाचे पाणी आले तर 7/7/2023 रोजी निळवंडे येथे या पाण्याचे जलपूजन झाले
——–
6) ना. बाळासाहेब थोरात साहेब यांनी निळवंडे धरण व कालवे हे 182 दुष्काळी गावे व दुष्काळी भागाकरता निर्माण केले असून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील जनतेने त्यांना जलनायक ही उपाधी दिली
————–
7) ऑगस्ट 2023 मध्ये अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय सुरू झाले
—————–
8) 26 सप्टेंबर 2023 रोजी भर पावसात भिजत संपूर्ण संगमनेरकर रस्त्यावर उतरले आणि हॅपी हायवे चा उद्घाटन समारंभ झाला
————-
9) वर्षभरामध्ये अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतून 1745 विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी मिळाली
————
10) 19 नोव्हेंबर 2023 रोजी आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
——-
11) यावर्षी कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकास पुरस्कार,
12) दंडकारण्य अभियानाला राज्यस्तरीय पुरस्कार
13) कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार
14) अमृतवाहिनी बँकेस ब्ल्यू रिबन पुरस्कार
15) राजहंस दूध संघास सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार
16) सौ. दुर्गाताई तांबे यांना आदर्श माता जीवन गौरव पुरस्कार मिळाले
—–
17) अजित पवार हे सत्ताधारी पक्षात सामील झाल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाने बजावली यामध्ये पावसाळी अधिवेशनात आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेतृत्व करताना सत्ताधाऱ्यांना नमोहरण केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी, अवकाळीची न मिळालेली भरपाई ,राज्यातील कायदा सुव्यवस्था, शिक्षणातील दुरावस्था, आरोग्य दुरावस्था यावर सरकारला धारेवर धरले
——
18) तर पावसाळी अधिवेशनामध्ये वाळू माफियांचा उच्छाद, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न ,याचबरोबर दूध दरवाढीबाबत सरकारला जाब विचारले
——
19) स्थानिक प्रश्न मार्गी लावताना विविध विकास कामांसाठी निधी मिळावीला
——–
20) साई पालखी दिंडीमध्ये निधन झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत मिळावी यासाठी आग्रही मागणी केल्याने या वारकऱ्यांना पाच लाख रुपये मदत मिळाली.
——–
21) कारखान्याने उच्चांची भाव देत कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले
——
22) अमृतवाहिनीचा मेधा- 2023 दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम व विविध क्षेत्रातील तज्ञांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमुळे लक्षणीय ठरला.
———–
23) यशोधनच्या 24×7 सेवेसह साहित्य क्षेत्रातील नामवंत, लेखक ,कवी, संपादक, पत्रकार, कलावंत, विविध बँकांचे अधिकारी, नाबार्डचे पदाधिकारी, सहकार, शिक्षण, कृषी ,अर्थकारण, क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटी संस्मरणीय ठरल्या.
—————–
Good By 2023
