सामाजिक चळवळीत ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानला गेला असून चळवळीतील कार्यकर्त्याना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम केवळ आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीनं केलं. हे सत्य आहे त्याचं चळवळीतील एक आपल्या स्वकतृत्वाने झेप घेणारा कार्यकर्ता म्हणजे संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील ऐतिहासिक व प्रवरा तिरावरील असणार्‍या आश्वी बु॥ या गांवातील एक थोर स्वातंत्र्य सैनिक व आदर्श शिक्षक नामदेव गायकवाड व लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेले बाळासाहेब गायकवाड हे होय .

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सहवासातून आंबेडकरी , दलित व रिपब्लिकन चळवळीला दिशा देणारे एक परम सहकारी बाळासाहेब गायकवाड यांचा आज 61 वा वाढदिवसा… निमित्ताने माजी केद्रीय कृषी मंत्री , तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदराव पवार , केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व माजी महसूल मंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आश्वी बु ॥ येथे एकसष्ट्री अभिष्टचिंतन होत असल्याने आमच्या सारख्या जुन्या सहकाऱ्यांना मनोमन आनंद होणारचं !

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांचे सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व स्विकारणार्‍या पैकी अहमदनगर जिल्हयातून माझ्यासह बाळासाहेब चव्हाण , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव यांच्यासह बाळासाहेब गायकवाड हे दलित पँथर पासून आठवले यांचे खद्दे समर्थक बनले . मात्र आक्रमक व बुलंद आवाजाच्या माध्यमातून सभा जिंकणे हे केवळ बाळासाहेबांनाचं जमले . कलात्मक माध्यमातून भारदार आवाजाची जणू त्यांना दैविक शक्तीचं प्राप्त झाली हे वावगे ठरणार नाही .

 

बाळासाहेब हे आंबेडकर चळवळीशी व पवार ,आठवले यांच्यासह जिल्हयातील कोल्हे – काळे – थोरात – विखे , तनपुरे – गडाख , पिचड , आदिक , तांबे , कर्डीले , जगताप , पाचपुते , राजळे , घुले , ढाकणे , कोते , शेळके यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक राजकिय व सहकार घराण्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित राहिले . आंबेडकर चळवळ म्हणून संघर्ष नायक रामदास आठवले व राजकिय क्षितिज म्हणून शरदराव पवार यांच्या विचारांचे वारसदार , विश्वासु सामान्य कार्यकर्ता , जिव्हाळू कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब गायकवाड हे सातत्याने अग्रही राहिले महाराष्ट्राच्या राजकिय व सामाजिक चळवळीच्या इतिहासात बाळासाहेब गायकवाड या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले जातील प्रखर वक्ता, बुलंद आवाज , संघटक, कार्यकर्ता, पँथर, प्रवक्ता, इत्यादी. होय

 

बाळासाहेबांच्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाने समाज मनावर विशेष ठसा उमटविला आहे. त्यांच्या कलात्मक वकृत्वातून अनेक कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. फुले-आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या म्हणून सातत्याने पन्नास वर्षापासून सामाजिकत्व व सामाजिक कटिबद्धता जपली . आंबेडकर चळवळीतील रामदास आठवलेसह रा सु गवई , भाई संगारे , राजा ढाले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, अविनाश महातेकर , राजा सरवदे , स्व .बाळासाहेब चव्हाण , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव , रमेश मकासरे , स्व दिलीप मुन्तोडे , रवि कांबळे , अंबादास आरोळे , रमेश बडेकर , महेद्र त्रिभुवन , दिपक गायकवाड , श्रावण वाघमारे , या जुन्या सहकाऱ्यांना बरोबर घेत दलित व पँथर चळवळीस बळकटी दिली तर पवन साळवे , कैलास शेजवळ , भाऊसाहेब पगारे , माणिक यादव , चंद्रकांत सरोदे , सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे , सौ संगिता धनजंय निकाळे , महेश गायकवाड , जितेंद्र रणशूर , सौ अलका शेजवळ , भिमा बागुल , सुनिल शिरसाठ , अब्दुले गुरुजी , शरद काका लोंढे , अजय साळवे , सुनिल साळवे , शांताराम संगारे , राजेंद्र गवांदे , आशिष शेळके , अशोक खरात , आदी कार्यकर्त्याना सामाजिक , राजकिय दिशा दाखवून सामाजिक व राजकिय सत्तेच्या प्रवाहात आणण्याकरिता सातत्याने पुढाकार घेतला .

 

बाळासाहेब हे आंबेडकरी चळवळीतील एक ‘ बुलंद नेतृत्व ‘ म्हणून परिचित आहेत. आंबेडकरी चळवळीसह विविध क्षेत्रात आपल्या प्रखर वकृत्वातून प्रभाव निर्माण केला त्यातील एक महत्त्वाचं स्थान आक्रमक नेतृत्व होय भेदक वास्तव मांडून चौफेर नस बंदी करणारे बाळासाहेबांनी आपली अगळी – वेगळी ओळखत निर्माण केली .

 

रामदास आठवले यांच्या सोबतीने दलित पँथर , ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ पुणतांबा गोळीबार , हनुमंत गांव जातीय दंगल , निर्मळ पिंप्री दलित अत्याचार आदी सह जिल्हयातील घडलेल्या घटनेतील लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता मौलिक योगदान दिले .

 

महाराष्ट्रातील आक्रमक कार्यकर्ता हे कदापी विसरू शकणार नाहीत. आंबेडकर चळवळीसह समाजकारण व राजकारणात कठोरपणे कृतिशील भूमिका बजावत एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण त्यांनी केली आहे. आंबेडकरवादी प्रतिमा कायम राहावी म्हणून संघर्षशील पणे तळमळीने काम केले चळवळीशी तडजोड न करता आपली भूमिका ठाम ठेवली . त्याचा त्रास ही झाला, तर मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये भाग घेत आपल्या इराद्या पासून ते कधी ही विचलित झाले नाहीत.

पँथर , रिपब्लिकनच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून देऊन अथक कार्य करण्याचा संकल्प पूर्ण करत सामाजिक व राजकिय क्षेत्रात अनेक चढ-उतार आले मात्र विचाराशी ठाम राहिले . शरदराव पवार यांच्यासह सहकारी व राजकिय जिल्हातील सत्ताधारी असो या विरोधक असो या नेत्याशी त्यांचे स्नेही व सलोख्याचे संबंध राहिले त्या संबंधाचा कधीही बाळासाहेब यांनी गैरफायदा अथवा दुरोपयोग केला नाही तर अनेक राजकिय नेत्याशी जवळीक राहून ही त्यांनी आंबेडकर चळवळीशी व रिपब्लिकनशी फारकत घेतली नाही मात्र काही काळ रिपब्लिकन पँथर पक्षाची स्थापना करुन आपली आगळी – वेगळी ओळख निर्माण केली मात्र तेथे आठवले शिवाय मन रमले नाही पुन्हा स्वगृही परतले .

“आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” हे ब्रीज वाक्य त्यांचे कार्यकर्त्याना असे राजकिय सत्तेकरिता आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. ही विचारधारा घेवून आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ बाळासाहेब बनले . एक माणूस म्हणून पारदर्शक त्याच्यात दिसली त्यांचा सहज सरळ व भोळा स्वभाव, साधी राहणीमान ,प्रसंगी आक्रमक स्वभाव सामाज्यात दिसले त्यातून आदराचे स्थान निर्माण केले त्यांचा नाबाद 61 वा वाढदिवस असल्याने शरदराव पवार , रामदास आठवले व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत एकसष्टी होणे असे भाग्य किंचित लोकांच्या नशिबी लाभते तर शिर्डी लोकसभा आरक्षित असल्याने व निवडणुकीच्या मुर्हुतावर शरदराव पवार येणे म्हणजे काही तरी राजकिय गणिते ढवळून निघणार यात तिळमात्र शंका नाही कदयाचीत बाळासाहेबांच्या नशिबी राजकिय पर्वाला नवी दिशा ठरणार तर नाही अशी चर्चा होऊ लागली असून या माध्यमातून सर्वसामान्य व चळवळीच्या कार्यकर्ता लोकसभेची नक्कीचं संधी मिळू शकते ते पवाररुपीचं !

 

 बाळासाहेब यांना एकसष्टी निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन व त्यांच्या भविष्यकालीन सर्व उपक्रमांना शुभेच्छा !

 

विजयराव वाकचौरे (प्रदेश उपाध्यक्ष रिपाई महाराष्ट्र)

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed