बाळासाहेब गायकवाड यांनी आपला मुलगा महेशला व्यापारी दृष्टया व ऐतिहासिक असणार्‍या आश्वी बु॥ गांवच्या प्रथम लोकनियुक्त संरपच बनवून जनतेला राजकिय व सुखद धक्का दिला . आज देशातील उच्च श्रेणीतील प्रतिभावंत व राजकारणात भीष्म असणारे आदरणीय शरदचंद्र पवार यांना आपल्या ‘ एकसष्टी ‘ वाढदिवसाकरिता आश्वीत आणून दुसरा धक्का दिला .या गोष्टीवर विश्वास बसत नाही ही किमया केवळ बाळासाहेब गायकवाड यांनी करावी . बाळासाहेबांचे रहस्यमय व बुलंद व्यक्तीमत्व कोणाला न वाचत येणे इतकं गुंतागुंती गोष्ट होय .

 

आदर्श शिक्षकांचा मुलगा पण जास्त शिक्षण झाले नाही , जास्त शिक्षण झाले असते तर बाळासाहेबांचे चरित्र कोठे असते ही कल्पनाचं करवत नाही . समाज्यात जे लोक यशस्वी झाले ते मोठेही झाले ज्यांनी क्रांती करुन दाखविली त्यांनी आपल्या शिक्षणापेक्षा शहाणपणावर किमया केली यात तिळमात्र शंका नाही . त्यापैकी बाळासाहेब नामदेव गायकवाड होय . मणुष्याच्या जीवनात ईश्वरांची देणगी कोणत्या ना कोणत्या रुपाने मिळते . त्या मिळालेल्या ईश्वरी देणगीचा कोणी वापर करतो तर कोणी दुर्लक्ष करतो कोणी इतिहास घडतो तर कोणी राजकारणात , सामाजिक , आर्थिक , व्यापारिक , सहकारात , क्रांती करुन दाखविली . त्यातील बाळासाहेब हे एक कला गुणात्मक चौफेर व्यक्तीमत्व आहे .

 

बाळासाहेबांनी आपल्या सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झुंज दिली त्या परिस्थितीतून निराश न होता मार्ग काढला त्या परिस्थितीचा अभ्यास करुन आपली आगळी – वेगळी प्रतिमा निर्माण करत समाज्यात एक आदराचे स्थान बनविले हे काम कोणत्याही सामान्य माणसांच्या पलिकडे आहे . मणुष्याला ‘ सिक्स सेन्स ‘ नावाचा बुद्धीचा अविष्कार असून ही काही मणुष्यांनाचं प्राप्त होते त्यातील बाळासाहेब गायकवाड हे आहेत .

 

आंबेडकर चळवळीत तन – मनाने बाळासाहेबांनी आपल्या स्वतःला वाहून घेतले अन्याय अत्याचारांच्या विरोधात ठोस भूमिका घेत न्याय भूमिका मिळवून देण्याचे सदैव प्रयत्न केले प्रसंगी शांततेची व सामंजस्यपणाची भूमिका घेत समाज्या – समाज्यात नि:स्वार्थीपणे एकोप्याचे दर्शन घडविले .

 

राजकारण हे कोणाला ही जमत नाही , त्याची भूमिकाचं वेगळी असते . चळवळीतील अनेकांनी राजकारणाचा खडतर प्रवास केला मात्र काही टिकले काही गळाले , काही नामशेष झाले . शेवट करणारे बोटावर मोजण्या इतकेचं राहतात त्यातील बाळासाहेब गायकवाड होय . बाळासाहेब हे आपल्या ‘ वकृत्वाने , कतृत्वाने , ठोस भूमिका , बुलंद आवाज व कलागुणाच्या पाच सुत्री कलमाने समाज्यात आपली आगळी – वेगळी छाप पाडली . आपल्या शांत व गोड स्वभावातून स्व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात , स्व शंकरराव काळे , स्व शंकरराव कोल्हे , स्व पदमभूषण बाळासाहेब विखे , स्व गोविदराव आदीक , शंकरराव गडाख , मधुकरराव पिचड , प्रसाद तनपुरे , माजी मंत्री बाळासाहेब थोरात , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , रावसाहेब म्हस्के या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त शरदराव पवार , जयंत पाटील स्व आर आर पाटील , केद्रींय मंत्री रामदास आठवले , रा सु गवई , जोगेंद्र कवाडे , प्रकाश आंबेडकर यांच्याशी स्नेही व सलोख्याचे राजकारणा पलिकडे संबंध राहिले .

 

बाळासाहेबांच्या जीवनाच्या चढ – उतारा ते एकसष्टी पर्यत पोहचले त्याच्या एकसष्टी निमित्ताने देशाचे जेष्ठ नेते शरदराव पवार हे स्वतः आश्वीत येत असल्याने ऐतिहासिक घटना असून जीवनात बाळासाहेबांनी काय कमविले ही त्यांची आयुष्यांची पोहचं पावती आहे . आंबेडकरासह शाहू – फुले यांच्या विचाराशी समरस होत व श्रद्धा ठेवत जनकल्याण करण्याचे एक धोरण ठेवले . यातून समाज , राष्ट्रप्रेम जोपासले . तर सामाजिक , राजकिय प्रवास करताना आपल्या कुटुंबाला ही आधार व वेळ दिला . यात त्यांना आपली पत्नी वैशाली यांची मोलाची साथ मिळाल्यानेचं बाबा , महेश , गणेश या मुलांना सुसंस्कृत व उच्च शिक्षित बनविले .

 

त्याच्या होणार्‍या एकसष्टी होणार्‍या सोहळ्यातून भविष्याच्या वाटचालीकरिता एक उर्जा व संजीवनी मिळणार हे निश्चित ! त्यातून मोठे कार्य घडण्याचे संकेत त्याच्या नशिबी योवो हीच शुभ कामना !

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed