संगमनेर । झुंजार न्यूज

कर्मविर भाऊराव पाटील विद्यालय व ज्यु कॉलेज आश्वी खुर्द येथे ३१ वर्षे प्रदिर्ध शिक्षण सेवा करून नुकतेच सेवा निवृत्त झालेले पिंप्री लौकी अजमपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक प्रा कान्हु गिते सर यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार संभारंभ आश्वी खुर्द येथील नामांकित गिते सायन्स क्लासेस येथे आयोजित केला होता त्या प्रसंगी बोलतांना भाजपा सरचिटणीस भारतराव गिते म्हणाले शिक्षण क्षेत्रात भरिव काम करतांना आपण जनतेचे देणे लागतो या भावनेतुन प्रा कान्हु गिते सरांचे सामाजिक राजकिय धार्मिक क्षेत्रातले काम ही उल्लेखनिय असुन शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कामही अग्रेसर आहे असे प्रतिपादन केले

 

या सत्कार सभारंभाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सिताराम गिते होते 

 

ते पुढे बोलतांना म्हणाले . शिक्षकी पेशामध्ये काम करतांना अनेक जण शाळा घर प्रपंच याच्यापलिकडे जात नाही पण गिते सरांनी प्रतिकुल परिस्थिति मध्ये पिंप्री लौकी गावच्या समाजकारण राजकारण धार्मिक कामात स्वःताला वाहुन घेतले वेळप्रसंगी स्वःताच्या खर्चाने धार्मिक कामात पुढाकार घेऊन पुर्णत्वाकडे नेले एक उत्कृष्ट समाजकारणी म्हणुन आपली ओळख निर्माण केली संघटन व गावपातळी वर संस्था उभ्या करून शेतकरी शेतमजुर बेरोजगार तरुण यांना आधार दिला नोकरी पण उत्तम करून उरलेल्या वेळेत दिशा देण्याचे काम केले महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पा जि.प मा अध्यक्षा ना शालिनीताई विखे पा यांच्या मार्गदर्शना खाली पिंप्री लौकी अजमपुर गावातील विकास कामामध्ये हिरारीने भाग घेतला . अशा पद्धतीने उत्तम काम करून आपली स्वःताची आगळी वेगळी ओळख निर्माण केली . सेवानिवृत्ती नंतर गितेसरांनी समाजकारणाबरोबर शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करण्याची मागणी केली

 

हा सत्कार सभारंभ गिते सायन्स क्लासेसचे संचालक प्रा अशोकराव गिते व युवानेते मंगेश गिते . व पिंप्री ग्रामस्थांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी पद्मश्री विखे सा का संचालक डॉ दिनकराव गायकवाड , श्री बाळासाहेब मांढरे , मकरंद गुणे , संजय गायकवाड , दिपक सोनवणे , भाऊसाहेब मुंढे , भाऊसाहेब लावरे , भास्करराव गिते , माजी उपसंरपच दौलत दातीर , उपसरपंच बाजीराव गिते , श्री रामदास दातीर , श्री भिमराज राहींज , भिमराज गिते ,भाऊसाहेब सांगळे , ग्राम सदस्य श्री अनिलराव गिते ,भारत सुकदेव गिते , श्री लक्ष्मण गिते , बाजीराव देवराम गिते , सुर्यभान गिते , गोवर्धन गिते , सुरेश दातीर , दादाहारी गिते , ज्ञानदेव गिते , बाळासाहेब गिते , मगन गिते , गोरक्षनाथ गिते , अनिल छबु गिते , सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सुत्रसंचलन प्रा अशोकराव गिते सर यांनी केले तर आभार श्री संजय बिडवे यांनी मानले .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *