लोणी । झुंजार न्यूज

 

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषीदुतांचे आगमन झाले आहे . यावेळी पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी या कृषीदूतांचे स्वागत केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या कृषी शिक्षण संचालिका व कृषी महाविद्यालय लोणी च्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक प्राचार्य रमेश जाधव,कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. डॉ. दिपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत पृथ्वीराज ढगे, उमेश वानखेडे, संकेत मोटे, सुयश भोसले, शुभम तळेकर, सिद्धांत देशमुख हे अस्तगाव येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान याप्रसंगी ग्रामपंचायत अस्तगाव चे सरपंच सौ.सविता चोळके, माजी सरपंच नवनाथ नळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल नळे, सदस्य राहुल चोळके, माजी सभापती निवास त्रिभुवन,प्रतिष्ठित ग्रामस्थ व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, गांडूळखत उत्पादन, चारापिके, दुग्ध व्यवसाय, बायोगॅस यासंधर्भात माहिती देणार आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *