आश्वी । झुंजार न्यूज

रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी येथील श्रेया अनिल मुन्तोडे हिने संगमनेर पंचायत समिती व संगमनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पर्यावरणीय समतोल टिकवण्यासाठी उपयुक्त सीड बॉल्स या विषयातील श्रेयाचे उपकरण तालुक्यातील सर्व उपकरणात अव्वल ठरले.

 

 

श्रेया हिने संगमनेर तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची अहमदनगर जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात श्रेया संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय तसेच विज्ञान क्षेत्रातील मान्यवराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

नाविण्य,विषयाची योग्य निवड,उत्तम सादरीकरण , उपयुक्तता या बळावर श्रेयाने सदर यश मिळवले असल्याचे प्राचार्य जनार्दन बर्डे यांनी कळवले आहे.
याबाबत तिला तिचे वडील अनिल मुन्तोडे विज्ञान शिक्षिका शिला संसारे,भिमा सहाणे पर्यवेक्षक सुनंदा लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, उत्तर विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इनस्पेक्टर व सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी ,शालेय व्यवस्थापन व विकास समिती यांनी अभिनंदन केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *