आश्वी । झुंजार न्यूज
पिंप्री गावाचे सुपुत्र एक उत्कृष्ट व्यावसायिक न्याय डेअरी चे संस्थापक आध्यक्ष मा सागर गिते यांचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांना ग्रामीण भागात रोजगार मिळावा या उद्देशाने त्यांनी न्याय डेअरी चे स्थापना केली आणि अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला तसेच त्यांनी विविध प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना आमलात आणल्या.
शेतकऱ्यांसाठी तसेच तरुणांना न्याय देण्यासाठी अविरतपणे झाटणाऱ्या तरुण उद्योजक योध्यास समस्त ग्रामस्थ पिंप्री लौकी तसेच ग्रामपंचायत पिंप्री लौकी च्या वतीने अनंत वाढदिवसाच्या शुभेच्छा.
उद्योजक सागर चा सत्कार ग्रामपंचायत पिंप्री लौकी चे उपसरपंच श्री बाजीराव गिते मा उपसरपंच श्री दौलत दातीर ग्रामपंचायत सदस्य श्री अनिलराव गिते जनसेवा मंडळ चे श्री लखन गिते श्री अशोक दातीर आणि गिते सायन्स क्लास अश्वि खुर्द चे संचालक प्रा श्री अशोक गिते यांनी केला.
