प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शाखेची पोरं हुश्शार..!
लोणी । झुंजार न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्ष परीक्षेच्या (मे २०२२) निकालातील सुवर्णपदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली.या परीक्षेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स इंजिअरिंगच्या (पीआरईसी) विद्यार्थी प्रतीक सोमनाथ लव्हाटे हा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला आहे. त्याने विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारी डॉ. डी. वाय. पाटील सुवर्ण पदक आणि स्व. श्री. मंदार श्रीपाद संत सुवर्ण पदक हे दोन सुवर्णपदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.
प्रतीक याचे वडील प्रा सोमनाथ लव्हाटे हे सर विश्र्वेश्वराय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिन्नर येथे प्राध्यापक तर आई प्रा. सीमा लव्हाटे या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनीअरिंग विभागाच्या हेड आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे डीन डॉ. शकील शेख यांनी सांगितले की,त्याला महाविद्यालयात शेवटच्या वर्गात शिकत असताना महाविद्यालयाच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून एकच वेळेस आयएफबी गोवा, टीसीएस पुणे, कॅपजेमिनी पुणे व जाबिल इंडस्ट्रीज पुणे येथे निवड झाली होती.सध्या तो जाबिल इंडस्ट्रीज पुणे येथे डिझाईन इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. या सर्व यशासाठी त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमधील सर्व प्राध्यापक व टिचींग- लर्निग प्रक्रियेला श्रेय दिलं.
प्रतीकला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी यांनी अभिनंदन केले आहे.
कोट……
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शाखेची पोरं हुश्शार..
प्रवरेत शिक्षणासोबत विविध उपक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप याद्वारे परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो, यामुळे हे यश आम्हा मुलांसाठी महत्वपुर्ण आहे.
विद्यार्थी प्रतीक लव्हाटे
