खळी । झुंजार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गवासी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त बी एस टी विद्यालय खळी च्या वतीने गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांच्या शाळेतील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली .

 

याप्रसंगी राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे भोलेनाथ दूध संस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील तांबे माजी उपसरपंच मधुकरराव वाघमारे सूर्यभान सानप शाळेचे मुख्याध्यापक श्री होळकर सर ज्येष्ठ शिक्षक गजानन वाणी सर शिवाजी वाघमारे भास्कर चकोर आधी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनावर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या जीवनातील आठवणी सांगत त्यांना आदरांजली वाहिली .

 

यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक गजानन वाणी सर यांनी दिनांक 7 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत आदरणीय भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाच्या सहभागी व्हावे नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे कार्यक्रम पाहण्यासाठी दररोज सायंकाळी जाणता राजा मैदान संगमनेर येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान जोशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहे सर यांनी केली

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *