संगमनेर । झुंजार न्यूज  



एस.एस.जी.एम.महाविद्यालय,कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य आंतरमहाविद्यालयीन (ऑनलाईन) वक्तृत्व स्पर्धेत सांघिक गटात अभिषेक वाघ व अश्विनी फटांगरे यांनी यश संपादन करून या महाविद्यालयाचा कै.सौ.सुशीलाबाई शंकरराव काळे स्मृती फिरता करंडक पटकविला आहे. तसेच गृह विज्ञान महिला महाविद्यालय लोणी येथे कर्तृत्व शालिनी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत समृद्धी आवारी हिने प्रथम तर अश्विनी फटांगरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. समृद्धी हिने भारतीय रुढी परंपरेत स्त्रियांचे स्थान या विषयावर तर अश्विनी फटांगरे हिने ढासळत्या कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांची भूमिका या महत्वाच्या विषयावर आपले विचार मांडले.

या सर्व विद्यार्थ्याचे त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा.ना.बाळासाहेब थोरात, चेअरमन मा.डॉ.सुधीरतांबे, आ.श्री.सत्यजित तांबे, नगराध्यक्षा मा. सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.लक्ष्मणराव कुटे, सह सेक्रेटरी मा.श्री.दत्तात्रय चासकर, संस्थेचे रजिस्टार बी.आर.गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य प्रा.डॉ.विलास कोल्हे, प्रा.डॉ.लक्ष्मण घायवट, कार्यालयीन अधिक्षक श्री.गोरक्षनाथ पानसरे यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना डॉ.संगीता वडितके, डॉ.राजेंद्र जोरवर, प्रा.वैशाली शिंदे, प्रा.निलोफर तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वृंद,विद्यार्थी यांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *