आश्वी | झुंजार न्यूज

२२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत होणार्‍या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमीत्ताने संगमनेर तालुक्यातील पुर्व भागांतील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावा – गावांमध्ये अक्षता कलश वाजत – गाजत फिरवून घरोघरी जावून अक्षता देत सोहळ्याचे आमंत्रण दिल्या जात असून, या कार्यक्रमाला नागरिकांचा ही उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

पानोडी , शिबलापूर , आश्वी बु ” , आश्वी खुर्द , शेडगांव , हंगेवाडी , पिंप्री लौकी अजमपूर , खळी , झरेकाठी , दाढ खुर्द , प्रतापपूर , चणेगांव , चिंचपूर , निमगांव जाळी , ओझर बु ” , ओझर खुर्द , कनकापूर , कनोली , मनोली , रहिमपूर , जोर्वे , कोल्हेवाडी , निबाळे , उंबरी – बाळापूर , सादतपूर , मालुंजे , डिग्रस , अंभोरे या गावांतील सर्व दुकानदार, शेतकरी व महिलांना घरोघरी जाऊन अक्षता वितरण करण्यात येवून गावात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
 

अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे भव्य असे मंदिर उभारण्यात आले असून, या मंदिराची एतिहासीक प्राणप्रतिष्ठा ही २२ जानेवारी ला होत आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी कोट्यवधी भारतीयांना आमंत्रण देण्याचा देशव्यापी शुभारंभ झाल्यानंतर आमंत्रणाच्या अक्षता ह्या गावा – गावांत पोहचल्या आहे प्रत्येक गावांतील प्रत्येक प्रभागातील घरोघरी जाऊन कुटूंबियांना अक्षताचे स्वयंसेवक , कार्यकर्ते , संयोजकांनी वितरण करताना दिसत आहे .

२२ जानेवारीला पानोडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह भजन , किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी गावांतील प्रत्येक घरासमोर शेण सडा , रांगोळी व दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अशोक तळेकर , रावसाहेब घुगे , गोपाळ थोरात , संजय जाधव , पांडूरंग सांगळे , दिपक जाधव , संतोष चव्हाण , बंडू जाधव , बाबासाहेब जाधव आदीसह संयोजकांनी केले आहे . 
 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed