20 लाखाचे सागवान व संसार उपयोगी वस्तूचे नुकसान
अंभोरे । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुरजित बाबुराव खेमनार दगडू भीमा खेमनर लहानु भिमा खेमनर सखाराम मंजाबापू खेमनर यांच्या मालकीचे अंभोरे गावात दोन मजली सागाचे लाखो रुपयाचा संसार आगीमध्ये जळून भस्मसात झाला असून या घटनेमध्ये जवळपास 20 लाखाचे सागवान व संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले
सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही सुरजित खेमनर व त्यांचे कुटुंब संगमनेर येथे नातलगाच्या लग्नासाठी गेले असता घरी कोणीही नसताना ही आग लागली घराशेजारीच गोठ्यात गायी शेळ्या जनावरे होती इमारतीतून जाळ मोठ्या प्रमाणे दिसू लागल्यामुळे प्रथम तरुणांनी गाई शेळ्या सोडून बाजूला नेल्या गावकऱ्यांनी व काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून घरातील काही सामान वाचवण्यास मदत केली गोठ्यातील जिवंत जनावरे सोडून बाजूला बांधली त्यामुळे कोणतीही जीवित हानी यामध्ये झाली नाही परंतु संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्यात
या घटनेमध्ये इमारतीचे वीस लाख रुपये किमतीचे सागाचे लाकडं जळून खाक झाली तर लाखो रुपयांचा संसार या अग्नी तांडवात भस्मसात झाला यावेळी संगमनेर कारखान्याची कारखाना अग्निशामक, नगरपालिका अग्निशामक दोन्ही घटनास्थळी दाखल होईपर्यंत घरातील बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या होत्या तरीही घरातील उर्वरित सामान व आग विझवण्यास अग्निशामक दलातील वस्तू वाचवण्यास मदत केली गावातील सर्व तरुणांनी ग्रामस्थांनी घर विझवाण्यास मदत केली
