पाथर्डी । झुंजार न्यूज

 

भाजपचे युवा कार्यकर्ते महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे स.संयोजक डॉ.धर्मराज सुरोसे यांची भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .

 

भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपची भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली.

 

या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न विविध समस्या, सोडविण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे डॉ. धर्मराज सुरोसे यांनी सांगितले.

 

या निवडीबद्दल नामदार राधाकृष्ण विखे खा.डॉ. सुजय दादा विखे , आ.मोनिकाताई राजळे, आ. रामजी शिंदे ,अभय आगरकर, राहुल दादा राजळे, तालुकाध्यक्ष तुषारभाऊ वैद्य ,अशोकराव गोरे,बापूसाहेब भोसले,बापूसाहेब पाटेकर, आदींनी अभिनंदन केले आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed