संगमनेर । झुंजार न्यूज

……………………………………..

संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या सधन असणाऱ्या कोकणगाव शिवापुर येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुुरवातीला प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून पुजापाठाने कार्यक्रमाला सुरवात झाली.यावेळी गावातून माता रमाई च्या प्रतिमेची फटाक्यांच्या आतषबाजीत वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.मिरवणुकीत तरुण वर्ग व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

 

यावेळी संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी माता रमाई चे जीवन चरित्र सांगुन माता रमाई चा आदर्श आवाहन केले.तर ग्रामपंचायत सदस्य कैलास पवार यांनी आपल्या शाहीरीतुन माता रमाई चे कार्य सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार भाऊसाहेब पवार यांनी केले.

 

यावेळी मच्चिन्द्र गवळी.दादासाहेब पवार. लक्ष्मण गवळी.नानासाहेब पवार. भाऊराव गवळी.सुदाम पवार. बाळु पवार. भागवत पवार.तेजस गायकवाड. सोमनाथ पवार. भारत गवळी.गोरख गवळी.सोमनाथ गवळी.विष्णु पवार मच्चिन्द्र पवार. रामनाथ गायकवाड. राहुल पवार. संजय पवार. सुरेश गवळी.किरण पवार. दिलीप गवळी.महेंद्र गवळी.मंगेश पवार. अनिकेत पवार अशोक पवार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन केले तर आनंदा कोंडीचा पवार. नानासाहेब सिताराम पवार.सोमनाथ भिवा पवार यांनी भोजन दान दिले.विष्णु पवार यांनी लाईट डेकोरेशन व सांऊड सिस्टम मोफत देवुन करून सहकार्य केले.भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *