शिर्डी । झुंजार न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्ताने स्वराज सप्ताह निमित्ताने शिर्डी शहरातील उद्योजक संदिप भिमाशंकर सोनवणे व सुनील सोनवणे यांच्या कुंटबाच्या वतीने लहान मुली सई हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन वयोवृद्धांना देण्यात आले व त्याबरोबर वृध्दाश्रमसाठी काही मदत देखील देण्यात आली
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे राहता तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे म्हणाले ज्या वयोवृद्ध लोकांना कोणाचा आधार नाही त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सोनवणे कुंटबाच्या वतीने आर्थिक मदत व भोजन देऊन सामाजिक दायित्व जपण्यासाठी आमच्या कुटुंबातील सर्वाची भावना असल्याने हा उपक्रम घेतला असल्याचे सांगितले
यावेळी साईची आरती करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली यावेळी रुपाली सोनवणे सोनाली सोनवणे कुमारी श्रीनिका सोनवणे सार्थक सोनवणे सृष्टी सोनवणे सचिन तुरकणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते
