आश्वी । झुंजार न्यूज
बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या सामाजिक , राजकिय चळवळी पुढे घेवून जाण्याकरिता आप – आपल्यातील मतभेद विसरून एकजुटीने काम करा , एकीपणा नसल्यामुळेचं आतापर्यत मित्र पक्षांनी या गोष्टीचा फायदा घेतला आहे असून आता पर्यंत मित्र पक्षाच्या नेत्याबरोबर रिपाई चे मैत्रीपुर्ण संबंध असताना ही कार्यकर्त्यांना अदयाप सन्मान व सत्तेचा वाटा मिळून न दिल्यांची खंत रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 मार्च 2024 रोजी अकोले व संगमनेर शहरात होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजना करिता आश्वी बु ॥ येथे घेण्यात आलेल्या बैठकीत वाकचौरे बोलत होते .
या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माणिकराव यादव , तालुकाध्यक्ष आशिष शेळके, अकोले तालुकाध्यक्ष तथा कळस संरपच राजेंद्र गवांदे , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश शिरकांडे , कार्याध्यक्ष विजयराव खरात, अमोल रागपसरे ,शहराध्यक्ष कैलास कासार, युवकाध्यक्ष योगेश मन्तोडे , मधुकर सोनवणे, विकास गायकवाड, पप्पू रोकडे, शरद तपासे, शरद जमदाडे, आत्माराम आडंगळे, प्रकाश वाघमारे, जनार्दन साळवे, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, संपत भोसले, गौतम वर्पे, सागर शिंदे, भरत भोसले, स्वप्निल कदम, रमेश भोसले, नवनाथ भोसले, नंदू शिंदे, विजय अडांगळे, प्रकाश टपाल, रवी रोकडे, युवराज भालेराव, शाहनवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, सिद्धार्थ खरात, योहान मिसाळ, राजू वाघमारे, रमेश तपासे, गणेश गायकवाड, लक्ष्मण मेढे, मच्छिंद्र पवार, नाना जगताप, सागर गायकवाड, कल्याण कदम, अमित रोकडे, सनी लोंढे, सौरभ शेळके, प्रतिक शेळके, अभिषेक शेळके, सुनील कदम, विजय खेमनर, सुभाष शेळके, सतीश जगताप आदीं उपस्थित होते ..
यावेळी अकोले व संगमनेर मध्ये केद्रींय मंत्री रामदास आठवले व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष मेळावा घेण्यात येणार असून कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करत वाकचौरे म्हणाले की , संध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत असून बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष हा तळागाळातील फाटक्या – तुटक्या माणसांना घेवून जात आहे अशा पक्षाच्या नेतृत्वाला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मिळाली पाहिजेल अशी दलितांसह बहुजन समाज व कार्यकर्त्याची इच्छा आहे ही संधी भाजपा नेतृत्वा दयावी अशी मागणी होत आहे .
यावेळी आशिष शेळके यांनी प्रास्ताविक केले .
