छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रविण कानवडे यांची माहिती
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर येथे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९.३० वाजे दरम्यान शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवप्रतिमा मिरवणूक व मोटार सायकल रॅली, अभिवादन सोहळा, शिवज्योतीचे स्वागत व खिचडी वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती छावा संघटनेचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रविण कानवडे यांनी दिली.
यामध्ये युवक युवती महिला पुरुष व सर्व शिवभक्त सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजता संगमनेर शहरातील ऑरेंज कॉर्नर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक व मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यांनतर सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन सोहळा व किल्ले शिवनेरी येथून शिवज्योतचे आगमन होणार असून या शिवज्योतिचे भव्य स्वागत होणार असून सकाळी ९.३० वाजता संगमनेर बस स्थानक येथील दत्त मंदिर याठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी युवकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. सर्व शिवप्रेमींनी शिवजयंती महोत्सवात सहभाग घ्यावा सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
