पिडीत मुलींची सुटका दोघावर कारवाई
शिर्डी । झुंजार न्यूज
तात्कालिन उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी अवैध वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले काही प्रमाणात यश मिळाले तरी अजुनही शिर्डी सह उपविभागात हा व्यवसाय परराज्यातील मुली आणुन सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी शिरिष वमने यांना पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक कारवाई पोलीस अधीक्षक,राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डि वाय एस पी शिरीष वमने , सपोनि कैलास वाघ, इरफान शेख, अशोक शिंदे, असीर सय्यद श्याम जाधव,संगीता नागरे निलेश सातपुते चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे शिवाजी नर्हे यांनी कारवाईत भाग घेतला आहे.
