आश्वी खुर्द , निमगांव जाळी येथील प्रा . आरोग्य केंद्रातील महिलांनी जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांना दिले निवेदन !
आश्वी । झुंजार न्यूज
आपल्या जीवाची पर्वा न करता आशा गटप्रवर्तक सेविकांनी कोरोना काळात तुटपुंज्या मानधनावर काम केले होते. त्यावेळी सरकारने मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही मानधनात वाढ न झाल्याने आशा गटप्रवर्तक, सेविका चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. लोणी मधील आशासेवकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील वाड्यावर जावून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्यासमोर समास्या मांडल्या.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द , निमगांव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक काम करत आहेत. त्यांना दिवाळी भेट दोन हजार रुपये, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात सात, तर गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजारांची वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपात सर्वांनी कामकाज बंद करून सहभाग घेतला होता. या दरम्यान आरोग्यमंत्री डॉ. तान्हाजी सावंत यांनी कृती समवेत बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसत असून गेल्या १० दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानात हजारोच्या संख्येने आशा वर्कर व गट प्रवर्तक अन्न पाण्याविना उन्हा – तान्हात उपोषन करत आहे तरी सुध्दा सरकारला यांची दया येत नसल्याने आता महिला आक्रमक झाल्या आहे .
आपल्या विभागात अथवा परिसरात असणार्या लोक प्रतिनिधीना आमच्या मागण्या मान्य व्हावे याकरिता निवेदने देत आहे त्यानुसार शिर्डी विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी तथा महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना आश्वी व निमगांव जाळी परिसरातील २८ गावामधील आशा सेविका व गट प्रवर्तक यांनी निवेदन दिले मात्र महसूल मंत्री नसल्याकारणाने जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदने देत आमच्या मागण्या आपल्या मार्फत सोडवा असे आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी गळ घातली तर मागण्या सरकार पर्यत पोहच करणार असे सौ विखे यांनी आश्वासीत केले .
यावेळी मंगल जोशी , कल्पना जोशी , शोभा गायकवाड , रुपाली सोनवणे , मिना बिडगर , कल्पना डेंगळे , कडुबाई तक्ते सुरेखा मांडे , मालन बोर्डे , दुर्गा चौधरी , संगिता पारधी मालन बोर्ड , सविता डोळे , प्रमिला गायकवाड ,सुजाता भुसाळ आदीसह आशासेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या .
