शिर्डी लोकसभेतून रामदास आठवलेनी उमेदवारी करावी कार्यकर्त्यांच्या भावना !
संगमनेर । झुंजार न्यूज
केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी संगमनेर – अकोले येथे सामाजिक सलोखा परिषद होणार असल्याने या निमित्ताने गट – तट विसरुन रिपाईसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संगमनेर येथील विश्रामगृह मध्ये नियोजन बैठक संप्रन्न झाली .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई ( आठवले ) उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , रिपाई युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , दिपक गा गायकवाड , माणिकराव यादव , भारतीय दलित पँथर जिल्हाध्यक्ष राजू खरात , अॅ ड किरण रोहोम , प्रविण गायकवाड , रिपाई संघटक रमेश शिरकांडे , तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे , तालुकाध्यक्ष तथा कळस संरपच राजेंद्र गवांदे , कार्याध्यक्ष विजयराव खरात, अमोल रागपसरे , मधुकर सोनवणे, प्रविण बनसोडे , विकास गायकवाड, पप्पू रोकडे, शरद तपासे, शरद जमदाडे, आत्माराम आडंगळे, प्रकाश वाघमारे, जनार्दन साळवे, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, संपत भोसले, गौतम वर्पे, सागर शिंदे, भरत भोसले, स्वप्निल कदम, रमेश भोसले, नवनाथ भोसले, नंदू शिंदे, विजय अडांगळे, प्रकाश टपाल, रवी रोकडे, युवराज भालेराव, शाहनवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, सिद्धार्थ खरात, योहान मिसाळ, राजू वाघमारे, रमेश तपासे, गणेश गायकवाड, लक्ष्मण मेढे, मच्छिंद्र पवार, नाना जगताप, सागर गायकवाड, कल्याण कदम, अमित रोकडे, सनी लोंढे, सौरभ शेळके, प्रतिक शेळके, अभिषेक शेळके, सुनील कदम, विजय खेमनर, सुभाष शेळके, सतीश जगताप आदीं उपस्थित होते .
विजयराव वाकचौरे म्हणाले की ,
संध्याचा राजकिय गोंधळ बघून समाज्या – समाज्यात तेढ निर्माण होत आहे दलित समाज्यासह बहुजन समाज एकसंघ ठेवण्यासाठी रामदास आठवले हे एकमेव नेता प्रयत्न करत आहे . आठवले यांनी कधी ही जाती – पातीचे राजकारण केले नाही . समाज्यातील प्रत्येक माणसाच्या अडी – अडचणी सोडविण्याकरिता धावून जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत . तेव्हा होणार्या सामाजिक सलोखा परिषदेतून सामाजिक शक्ती प्रदर्शन घडविण्यासाठी दलित समाज्यातील सर्वानी गट – तट विसरुन एकत्र येवून संगमनेर येथील कार्यक्रम भव्य दिव्य करावे असे आवाहन वाकचौरे यांनी केले आहे तर गेल्या १४ वर्षांपासून भाजपाशी रिपाईची युती आहे रामदास आठवले व कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केले मात्र पाहिजेल तसा सत्तेचा वाटा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत रामदास आठवले यांनी दलित , मराठा , ओबीसी , आदिवाशी , शेतकरी , कष्टकरी , महिला , तरुणांसाठी सातत्याने लढले .
लोकसभेचे पडघम वाजल्याने सर्व पक्षाची कार्यक्रम होवू लागले गट तटाचे राजकारण न करता आपण एकसंघ राहिले पाहिजेल .
आता समाज्याकरिता गट – तट विसरुन सर्वांनी एकत्र आले हे मोठे भाग्य असून विखे – थोरात वाद आहे मात्र ते ठराविक क्षणाला एकत्र येतात मग आपण का मागे रहायचे . कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा समाज्यात एकी दाखवा तर विदयमान व माझी खासदारावर मोठ्या प्रमाणात नाराजी असून हक्क्याच्या माणसाकरिता एकत्र आले पाहिजेल व त्याच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजेल . आता स्थानिक प्रतिनिधीना विनंती करा की आता आम्हाला मदत करा विधानसभेला उघडपणे काम करु संपूर्ण देशात फिरणारा एकमेव नेता आहे आमचा , तर कार्यकर्त्यानी मताची विभागणीय होवू नये म्हणून काम करायचे आहे .
गावा गावात झेंडा , बॅनर लावा होणाऱ्या कार्यक्रमातून शक्ती प्रदर्शन होणे महत्वाचे असल्याने गावा गावात वाड्या वस्त्या मध्ये जावून निमत्रंण दया . आता समाज जागृत झाले असून आठवले यांना उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडी सुद्धा विचार करेल .
रामदास आठवले हे निवडणुक लढणार असल्याने हे आपणाकरिता अभिमानाची गोष्ट आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठ कारखाने , राज्य पातळीवरील ३ दूध उत्पादक संस्था असल्याने ऊस , दूध हे प्रामुख्याने प्रश्न सोडवा मते आपोआप वळेल तर आपण समाज म्हणून रामदास आठवले यांच्याशी निगडीत रहा . ही निवडणुक निळ्या झेंड्या पुरर्ती ठेवू नका ! गावच्या पुढार्याना प्रचार करण्यास सांगा
डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सर्व घटकांना एकत्र करु वार्डनुसार व खेडो – पाडी जावून समाज्यातील प्रत्येक माणसाना येण्याचे आवाहन करा , कार्यक्रमातून चळवळीत आलेली मरगळ निघू जाते . चळवळ गतीमान झाल्यास राजकिय क्षेत्रात दबाव ( प्रभाव ) पडल्यास न्याय मिळतो एकीपणामुळे संघटन होते .
आता पर्यत १५ वर्षाच्या कार्यकाळात वाकचौरे अथवा लोखंडे यांनी दलित समाज्याच्या वस्तीला किती निधी दिला हा प्रश्न उपस्थित करत रामदास आठवले निवडणुकीला येणार असल्यास आम्ही गट – तट विसरुन काम करु
दलित समाज्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात रामदास आठवले हे सातत्याने खंबीर पणे उभे राहिल्याचे दिसून येत आहे . आपला माणुस तो आपला माणुस तेव्हा सर्वांनी एकत्र यावे .
बऱ्याचं वर्षानंतर रामदास आठवले यांचा कार्यक्रम होत आहे सामाजिक सलोख्याच्या माध्यमातून माणुस – माणुस जोडण्यांचे काम होणार असल्याने ५ मार्च रोजी होणारा कार्यक्रम हा भूतो न् भविष्य असा होईल त्याकरिता विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गट – तट विसरुन एकसंघ यावे ही होणारी शक्ती प्रदर्शन भविष्यांची ताकद निर्माण होणार आहे .
