आश्वी | झुंजार न्यूज

 

रूबाबदार, देखणे आणि बलाढ्य, देखणे असे घोडे संगमनेरकरांना पाहता आले. घोड्याच्या अनोख्या स्पर्धा श्री क्षेत्र देवगड येथे रंगल्या होत्या . श्री क्षेत्र देवगड येथील खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त अश्व प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत अनेक रूबाबदार असे घोडे सहभागी झालेले होते. जातिवंत घोड्यांचे आणि घोड्यांच्या नाच व चालीचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आल्याने संगमनेरकरांनी त्याचा आस्वाद घेतला.

 

या प्रदर्शनामध्ये तब्बल100 घोड्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी नाच , चाल व घोडेस्वारांनी घोड्यांच्या माध्यमातून आपली कला सादर केली.ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 

या स्पर्धेत रुबाबदार, देखण्या, घोड्यानी सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडली. प्रत्येक घोड्यांनी चांगले प्रदर्शन दाखवले होते. आणि त्यातून या स्पर्धेतील विजेतेही घोषित करण्यात आले होते.

 

गेल्या ७ वर्षांपासून श्री क्षेत्र देवगड यात्रा निमित्ताने संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या पुढारकाराने अश प्रदर्शन व स्पर्धा होत आहे . दरवर्षी या स्पर्धेत राज्य व राज्या बाहेरून अश्व स्पर्धेक सहभागी होतात यावर्षी सर्व साधारण100 घोडे सहभागी झाले होते. या स्पर्धे तील अहमदनगर येथील सचिन अरुण जगताप यांच ७० इंच उंचीचा मारवाड जातीचा ” बींग जस्पर ” आकर्षण ठरला .

 

या स्पर्धेत घोड्यांच्या दोन प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. घोड्यांची भरदस्त चाल असते ज्याला नडगे म्हणतात किंवा कदम चाल म्हणतात, ती पण स्पर्धा होती. आणि दुसरं घोड्याला 64 खोडी असतात असं म्हटले जाते.

 

म्हणजे एखादा घोडा पाण्याला बघून थांबतो, एखादा घोडा काठीला बघून थांबतो, एखादा घोडा कलर बघून थांबतो. तर ह्या 64 खोडी किंवा 64 कला या घोड्याच्या ज्या आहेत. या सगळ्याची कलांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

 

ऐतिहासिक काळापासून घोडया लोकांना छंद असून घोडा हा प्राणी स्वामीनिष्ठ असल्याचे इतिहासात अनेक उदाहरणे आपण पाहिले आहेत मध्यतंरीच्या काळात छंद हा कमी झाल्याचे दिसून आले मात्र घोडा – बैल शर्यतीमुळे पुन्हा एकदा घोडयाना मागणी सुरु झाली त्यातून देवगड येथे राज्यात दोन नंबरचे अश्व प्रदर्शन होते . या स्पर्धतून मोठी आर्थिक उलाढाल होते .लग्न कार्यापासून अनेक कार्यक्रमातून घोड्यांचे लोकांमध्ये आकर्षण दिसत आहे मात्र संध्या राजकारणाच्या क्षितिजावरुन लोकांची खरेदी – विक्री होते त्यास ” घोडे बाजार ” हे म्हटले जात असल्याने विनाकारण घोड्यांना बदनाम केले जात असल्याची खंत अश्व असोशिएन अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केली . त्यामुळे अश्व प्रेमीच्या वतीने राजकिय गोंधळ्याच्या बाजारात घोडेबाजार हा शब्द उच्चारु नये ही विनंती देशमुख यांनी केली .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *