अहमदनगर । झुंजार न्यूज 

केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा समावेश झाला. त्यांनी मंगळवारी (ता.११) दिल्ली येथील शास्त्री भवन येथे समाज कल्याण मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे व जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी आठवले यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी दिल्ली येथील आठवले यांच्या निवासस्थानी अहमदनगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. विजय वाकचौरे यांनी रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा मिळालेले स्थान है आंबेडकरी जनतेची शक्ती असल्याची कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली.

आंबेडकरी जनता ही प्रामाणिक व एकनिष्ठ असून सत्तेकरिता कोणाच्या मागे जात नाही ज्याकडून सन्मान मिळतो त्याच्याशी प्रामाणिक राहणारा आंबेडकरी समाज आहे . जिल्हयात लोकसभा निवडणुकी दरम्यान शेवटपर्यत आंबेडकरी समाज्याला विश्वास घेतले नाही . ही खेदाची बाब असून भविष्यात स्वाभिमानाने आम्हाला सन्मान मिळावा अशी भावना विजयराव वाकचौरे यांनी मंत्री रामदास आठवले यांच्या जवळ व्यक्त केली 

साळवे म्हणाले की, आठवले पुन्हा सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले. हा आंबेडकरी जनतेचा अभिमान आहे. आंबेडकरी जनता महायुतीच्या मागे उभी राहिल्याने अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले. आठवले यांच्या माध्यमातून सत्तेत राहून समाजाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली. माझ्या उपेक्षित समाजासाठी व त्यांच्या कल्याणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, अनुसूचित जाती- जमाती, आदिवासी यांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. संविधानला कुणीही बदलू शकत नाही, ही रामदास आठवलेंची गॅरंटी आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed