पाथरे बु॥ : झुंजार न्यूज
टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आली होती.

लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे *श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पाथरे बु. ता. राहाता येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी प्रदक्षिणा संपन्न झाली.यावेळी विठ्ठल रुख्मिणी यांच्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी व वारकरी वेश परिधान केलेले विद्यार्थी, विद्यार्थिनींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेले होते. तसेच कलश सजवून सहभागी झाल्या होत्या.

या दिंडीमध्ये सजविलेला अश्व सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या गोल रिंगणाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. जय जय राम कृष्ण हरी..ज्ञानोबा माऊली..संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले प्रांगण.. टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले..सर्व अनुभवत होते. यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील भगवे झेंडे तर विद्यार्थ्यांनीच्या डोक्यावर तूळशी वृंदावन होते. हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास झाला.

अभंगांचे गायन करून टाळ आणि वीणा यांच्या तालावर ठेका धरत . विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घातलेले . विद्यार्थिनी नऊवारी, अलंकार, केसात गजरा आणि डोक्यावर तुळस घेऊन या वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या.विद्यालयात व श्री. दत्त मंदिर,श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरापुढे गोल रिंगण संपन्न झाले. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत सोहळ्याचा शेवट झाला.या दिंडी प्रदक्षिणामध्ये गावातील भजनी मंडळ,सहभागी झाले होते.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष मा. आबासाहेब पा.घोलप सरपंच उमेश पा. घोलप अशोक पा. कडू, दिलीप पा. घोलप सर,श्री भाऊसाहेब पा. घोलप, मा.संपत पा. सिनारे, मा.अशोक पा. घोलप श्री.भास्कर पा. घोलप बाळासाहेब पा.घोलप,मा.भाऊसाहेब सजगूरे, मा राजेंद्र पाटील घोलप विद्यालयाचे प्राचार्य मा.बारगुजे सर, उपप्राचार्य सौ.वाणी मॅडम, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.घुगे सर माध्यमिक विभागाचे समन्वयक श्री पारखे सर उच्च माध्यमिक विभागाचे समन्वयक श्री म्हस्के सर, सर्व शिक्षक -शिक्षिका, विद्यार्थी -विद्यार्थिनी पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
