कोल्हार | झुंजार न्यूज

 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ . सुरेश पानसरे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई भिमाशंकर पानसरे यांचे शनिवार दिनांक 13/7/2024 रोजी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकाळाने कोल्हार येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले.

 

श्रीमती गंगुबाई पानसरे ह्या तत्कालीन लालनिशान पक्षाचे व आत्ताच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते दिवंगत भिमाशंकर पानसरे यांच्या पत्नी होत तसेच शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या भावजई होत्या.

 

त्यांच्या पश्यात तिन मुले व तिन मुली असून संपुर्ण आयुश्यात त्यांनी आपले पती दिवंगत कॉम्रेड भिमाशंकर पानसरे यांना मोलाची साथ दिली रात्री बेरात्री कॉम्रेड पानसरे यांचे चळवळीतील सहकारी घरी आल्या नंतर त्यांना स्वयपांक करून जेवन करणे या साठी त्यांनी कधीही तक्रार केली नाही.

 

त्यांचे समकालीन कॉ. श्रीधर आदिक कॉ. भि . र . बावके कॉ . दत्ता देशमुख अ . बा. ईनामदार मधुकर कात्रे सुरेश गवळी वसंतराव सुरुडे बाबुराव चोखर इत्यादि कम्युनिस्ट मंडळीचें घरी कायमच येणे जाणे असायचे. हे सर्व मंडळी श्रीमती गंगुबाई पानसरे तथा बाई हिच्या हातचे जेवन केल्या शिवाय जात नसायचे.अतिशय घरातीलच मंडळी असल्या सारखा वावर वरील कॉम्रेड मंडळीचा घरात असायचा. हिच परंपरा त्यांचे चिरंजीव कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी चालु ठेवला आहे .पानसरे घराने हे चळवळीतील व डाव्या विचारसरनीचे घरान परंतु श्रीमती बाई ह्या अतीशय धार्मीक प्रवृत्तीच्या होत्या.

 

 

त्यांच्या निधनाची बातमी समजताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे भा . क. प. चे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कांगो जिल्हा सचिव अॅड कॉ. बन्सी सातपुते कॉ. ऍड. कॉ. सुधिर टोकेकर कॉ. मिलींद रानडे यांनी तिव्र दुःख व्येत केले आहे.
अहमदनगर जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने
आयटक कामगार संघटनेच्या वतीने रयत समाचार वृत्तपत्र समुहाच्या वतीने बाईंना भावपुर्ण श्रद्धांजली अखेरचा लाल सलाम.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *