आश्वी l झुंजार न्यूज

शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक डॉ राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २६ जुलै २०२४ रोजी अहिल्यानगर , राहुरी , श्रीरामपूर , कोपरगांव आदी ठिकाणी शिवसेना पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी निवड व आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील नियोजन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्य बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी दिली . 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून समाजातील गरीब घटकातील माणसांसाठी महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असून त्या योजना गावोगावातील विविध समाजातील प्रत्येक घटकांमध्ये पोहोचवण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे तसे शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम , विविध शासकीय योजनांची माहिती आदी प्रमुख विषयावर प्रदेशाध्यक्ष मुख्य प्रवक्ते डॉ राजू वाघमारे मार्गदर्शन करणार असून अहिल्यानगर येथे १० वाजता , राहुरी येथे ११ वाजता , श्रीरामपूर येथे १ वाजता तर कोपरगांव येथे ४ वाजता बैठक होणार आहे .
या बैठकीसाठी जिल्हयातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब पगारे , जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रोहित अशोक दिवे , संपर्कप्रमुख डॉ वसंत जमधडे , राहुरी तालुकाध्यक्ष पप्पू पवार ,  तालुकाप्रमुख रमेश पालगडमल , जिल्हा उपाध्यक्ष अनिल पालघर , भाऊसाहेब गायकवाड , संघटक कैलास पवार, राजेंद्र घायवट , रामनाथ पवार , सिद्धार्थ मेहेरखांब , लूकास धीवर , राहता तालुकाध्यक्ष जॉन पाळंदे , जिल्हा सहसचिव बाळासाहेब पाळंदे , पारनेर तालुकाध्यक्ष राहुल घंगाळे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भिंगारदिवे , विश्वास तवले , सुभाष आल्हाट , गौतम रोहम , वसंत खरात , सुनील बनसोडे , नितीन बनसोडे,  राजेंद्र जमधडे,  अनिल वाघमारे आदीनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *