आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे शनिवार दि १० ऑगस्ट २०२४ ते शनिवार दि.१७ ऑगस्ट२०२४ या दिवशीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली .

या सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत यांची शनिवार दि १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. सागर महाराज टिपरे ( संगमनेर ) , रविवार दि ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुनिल महाराज पवार ( आश्वी खुर्द ) , सोमवार दि .१२ ऑगस्ट रोजी ह.भ.प व्यंकटेश महाराज सोनवणे (निमगांव भोजापूर) , मंगळवार दि १३ ऑगस्ट रोजी ह.भ.प कुसूमताई महाराज तुरकणे (पिंळवाडी शिर्डी) , बुधवार दि .१४ ऑगस्ट रोजी ह.भ.प अशोक महाराज बर्डे (पानोडी) , गुरुवार दि. १५ ऑगस्ट रोजी ह.भ.प मधुसुदनगिरी महाराज (शिर्डी) , शुक्रवार दि . १६ ऑगस्ट रोजी ह.भ.प स्वामी दिनानाथ महाराज ऋषिकेश मृदुंगाचार्य , ह.भ.प गोकुळनंद महाराज पवार मृदुंगविशारद (आश्ची खुर्द) किर्तन होणार आहे तर शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी ह.भ.प उत्तम महाराज बढे (आळंदी देवाची) सकाळी ११ ते ०१ वा काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.


