{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

पानोडी l झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे अखंड हरिनाम सप्ताह दररोजच्या किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांतून मोठया उत्साहात साजरा झाला.

 

oplus_2

पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहा १० ऑगस्ट ते  १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान साजरा झालेल्या या सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील भक्ताकरिता महाप्रसाद असा दिनक्रम होता. संपूर्ण हनुमान मंदिरासह उभारण्यात आलेल्या सप्ताह मंडपात लाईटींगचा लखलखाट दिसून आला . तर सप्ताह सुरुवातीला व सांगताला ज्ञानेश्वरी ग्रंथांची संपूर्ण गावातून वाजत – गाजत मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीत डोक्यावर तुळस घेवून मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या .

 

गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनेक युवक व युवतीही ज्ञानेश्वरी पारायण केले .या सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत यांची शनिवार दि १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. सागर महाराज टिपरे ( संगमनेर ) , रविवार दि ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुनिल महाराज पवार ( आश्वी खुर्द ) , सोमवार दि .१२ ऑगस्ट रोजी ह.भ.प व्यंकटेश महाराज सोनवणे (निमगांव भोजापूर) , मंगळवार दि १३ ऑगस्ट रोजी ह.भ.प कुसूमताई महाराज तुरकणे (पिंळवाडी शिर्डी) , बुधवार दि .१४ ऑगस्ट रोजी ह.भ.प अशोक महाराज बर्डे (पानोडी) , गुरुवार दि. १५ ऑगस्ट रोजी ह.भ.प मधुसुदनगिरी महाराज (शिर्डी) , शुक्रवार दि . १६ ऑगस्ट रोजी ह.भ.प स्वामी दिनानाथ महाराज ऋषिकेश मृदुंगाचार्य ,  ह.भ.प गोकुळनंद महाराज पवार मृदुंगविशारद (आश्ची खुर्द) यांची किर्तन झाली तर शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी ह.भ.प उत्तम महाराज बढे (आळंदी देवाची) सकाळी ११ ते ०१ वाजेपर्यत काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .

 

सप्ताह यशस्वी करण्याकरिता भंजनी मंडळीसह जेष्ठ नागरिकासह पदाधिकारी व युवकांनी मोठे योगदान दिले .

 

 

चौकट 

या सप्ताहातून किर्तनकारांनी स्त्रीचा सन्मान करा, बालहत्या व गोहत्या टाळा , धर्म रक्षण करा आदीसह समाज संघटन व जाती भेद भाव न करता हिंदू धर्माचे नाव लौकिक करा आदी विषयावर प्रबोधन करत अखंड हरिनाम सप्ताहा हा समाज्यातील प्रत्येक घटकांना एकत्र जोडण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा एकमेव प्रसंग आहे हे सांगितले .

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed