{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील आदीवाशी व गोर गरिब समाज्यातील शालेय विदयार्थ्यांना मनसे मुंबादेवी मुंबई व स्वरराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय दप्तर व वह्या , पेनाचे वाटप करण्यात आले .
स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभा व स्वरराज प्रतिष्ठान यांच्या तर्फे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वह्या  व शालेय  साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले . डिग्रस हे गांव दुर्गम भागातील असल्याने येथे मोठया प्रमाणात आदीवासी समाज असल्याने त्याच्या विदयार्थ्यांना शिक्षण घेण्यात कुठली अडचण व कमतरता भासू नये म्हणून एक सामाजिक उपक्रम स्वरराज व मनसे तर्फ राबविला जात असून यांची संकल्पना डॉ दिलीप नागरे यांनी गेल्या १० वर्षापासून सुरु केली आहे . त्याप्रमाणे याही वर्षी आदीवाशी व गोरगरीब विदयार्थ्यांना शालेय दप्तर ‘ वहया , पेनाचे वाटप करण्यात आले 
यावेळी डिग्रस गांवचे संरपच अशोकराव खेमनर , मुंबादेवी मनसे तालुका उपसंघटक केशव मुळे , व विभाग अध्यक्ष प्रशांत गांधी उपविभागीय अध्यक्ष  अनिल शांताराम नागरे , डॉ दिलीप नागरे , बाळासाहेब नागरे आदीसह कार्यकर्ते व 250 विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed