अकोले | झुंजार न्यूज

संध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडी विरोधी महायुती चा सामना दिसणार आहे त्याचं अनुसंगाने महायुतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पक्षाने श्रीरामपूरसह राज्यात १८ जागेची मागणी केल्याने जिल्हयातील टिपब्लिकन कार्यकर्ता आक्रमक झाला असून संपूर्ण जिल्हयात श्रीरामपूर जागा मिळावी ही मागणी होत असताना अकोले येथे रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या रिपाई बैठकीतून “श्रीरामपूर विधानसभेची ” जागा मिळावी हा एकमुखी मागणी झाली 
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक रमेश शिरकांडे हे होते .  
अहमदनगर जिल्हा हा कायमच रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे . मात्र हेतुपुरस्सर रिपब्लिकन पक्षाला डावलण्यात आलेले आहे . तरी देखील युतीचा धर्म पाळण्याचे काम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे . मात्र येणाऱ्या काळात श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी ही एकमुखी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाला ही जागा मिळाली नाही तर अहमदनगर जिल्ह्यात कुठेही युतीचे काम न करण्याची शपथ घेण्यात आली . रिपब्लिकन पक्षाची युती ही भाजपा बरोबर आहे . मित्र पक्षाने रिपब्लिकन पक्षाचा योग्य सन्मान राखावा .  
अकोले विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने देखील एक ऑक्टोबर ला निर्णय घेणार असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी जाहीर केले आहे . तो पर्यंत कुठल्याही उमेदवाराचे समर्थन करणार नसल्याने  वाकचौरे यांनी सांगितले आहे . मात्र येणाऱ्या काळात शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहोजे . असे देखील विजयराव वाकचौरे यांनी सूचित केले .  
या बैठकीत रिपब्लिकन पक्षाची अकोले तालुका कार्यकारणी पुनर्गठित करण्यात आली . यामध्ये विजय पवार यांची युवक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर कैलास संगारे व रमेश वाकचौरे यांची तालुका उपाध्यपदी तर किशोर शिंदे यांची तालुका कार्याध्यक्षपदी रोहिदास साळवे यांची मातंग समाज आधाडीच्या तालुकाध्यक्षपदी तसेच अतिरिक्त जबाबदारी म्हणून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे . तसेच गणेश साळवे यांची जिल्हा संघटकपदी सचिन कदम यांची युवक आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी गुणरत्न साळवे यांची मुळा विभाग संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली . 
शाम गायकवाड यांची संघटन सरचिटणीसपदी राहुल चिकने यांची तालुका संघटकपदी प्रमोद गायकवाड यांची तालुका संघटकपदी कैलास नेपाळे यांची युवक आघाडीच्या  प्रमुख संघटकपदी प्रभाकर वाघमारे यांची प्रमुख संघटकपदी उत्तम आढाव यांची सह सरचिटणीसपदी पोपट कांबळे यांची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे . 
यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केली .  या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड,  जिल्हा संघटक प्रदीप आढाव,  कमलेश कसबे, विठ्ठल खरात, पास्टर गोदोन कर्णिक, आदींनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस हरिचन्द्र गोडसे,  भाऊसाहेब सिरसागर, सूर्यकांत जगताप, रामचंद्र तपासे, विजय गायकवाड, सचिन खरात,शंकर संगारे, साहिल मोहिते, शंकर वायाळ ,  अमर जाधव,  युवराज येडे, थोरात जी आर, काशिनाथ घोटकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते
येणाऱ्या काळात  सामूहिक नेतृत्वात सभासद मोहीम राबवून  तालुक्यात पाच हजार सभासद करण्याचे ठरले असून .जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर एकमत झाले आहे . 
विभागवार बैठका घेण्याच्या सूचना तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केल्या आहेत . केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन काम करत आहेत . नागालँड मध्ये देखील रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत . त्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना गवांदे यांनी दिल्या आहेत .  
झालेल्या निवडींच्या अनुशंगाने जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पु बनसोडे, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed