आश्वी l झुंजार न्यूज

 

 

भारत हा कृषिप्रधान देश असुन देशाची तसेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती या शेत्रावर अवलंबून आहे. भारतातील ७० टक्क्याहुन अधिक लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्विरत महाराष्ट्रात शेती हाच महत्वाचा व्यवसाय असल्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी सागितले.

 

 

 

संगमनेर तालुक्यातील खांबे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे मार्घशीर्ष शुध्द चंपाषष्ठी स्कंदषष्ठी मार्तंडभैरव देवस्थान भेट प्रसंगी निलमाताई खताळ बोलत होत्या.यावेळी सरपंच रवींद्र दातीर, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब खेमनर,रऊफ शेख सह महिलां महायुती चे कार्येकते ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

पुढे बोलतांना निलमाताई खताळ म्हणाल्या की, महायुतीचे सरकार हे सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.विधानसभा निवडणुकीत खांबे गावाना उच्चांकी मते देऊन सामान्या शेतकऱ्यांच्या मुलांना संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी दिली याबद्दल खांबे गावतील ग्राम दैवत खंडोबा महाराज यांचे आर्शीवाद घेऊन महायुती सरकार वर कृपा दृश्ठी रहावी यासाठी साकडे घालण्यासाठी आल्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमाताई खताळ आल्या होत्या.

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य जमता आमदार अमोल खताळ यांच्या पाठीशी उभी राहील्या मुळेच संगमनेर विधानसभेतील विजयाची नोंद ही इतिहासात झाली असुन खांबे हे गाव महायुती सरकार आमदार अमोल खताळ यांच्या सोबतच विकासाची गंगा ग्रामिण भागत आणण्यासाठी बरोबर असणार आहे

 

 

मा . रविंद्र दातीर ( सरपंच,खांबे,ता संगमनेर )

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *