संगमनेर l झुंजार न्यूज

 

महायुतीचे जायंट किलर संगमनेर विधान सभेचे आमदार अमोल खताळ यांनी मुंबई येथील विधानभवनात आमदार पदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संगमनेरात फटाक्याची आतिष बाजी करत एकच जल्लोष साजरा केला

 

 

 

 

 

 

संगमनेर विधानसभेवर गेली ४० वर्ष ज्यांची एक हाती सत्ता होती त्या माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव करत महायुतीतील शिव सेनेचे अमोल खताळ यांनी दणदणीत विजय मिळवला त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये जायंट किलर ठरले आहे ती सध्या मुंबईत असून त्यांनी महायुती मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांची भेट घेत प्रत्येकाचे आशीर्वाद घेतले

 

 

 

 

आमदार अमोल खताळ यांनी प्रथमच विधिमंडळात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी विधिमंडळाच्या पायरीवर माथा टेकवत नतमस्तक झाले त्यामुळे उपस्थित सर्वच आवाक झाले त्यांनी आज रविवारी विधि मंडळात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार पदाची शपथ घेतली

 

 

 

” मी अमोल मंगल धोंडीबा खताळ ईश्वर साक्षी ठेवून शपथ घेतो की…..

 

 

अशी वाक्य वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होताच आमदार अमोल खता समर्थकांनी फटा क्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *