आश्वी l झुंजार न्यूज
विधानसभा निवडणुका संपल्या अन् नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्याच्या सफेद पेहरावामधून भावगर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची चाचपणी सुरू झाल्याने आरक्षण कुठलेही निघू, मात्र, आपण प्रवाहात असल्याचे जाणीव करून देण्याची कार्यकर्ते धडपड करताना दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असणारा जोर्वे जिल्हा परिषद गटात आरक्षणाचा विचार न करता काँग्रेस व भाजप , रिपाईसह विविध संघटनेकडून इच्छुकांची चाचपणी सुरू असून हा गट म्हणजे थोरातांचे माहेर घर, तर विखे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने विखे थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्ही कडूनही विविध नावांची जोरदार चर्चा संध्या होताना दिसत असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागेल, अशी चर्चा होताना दिसत आहे.

जोर्वे जिल्हा परिषद गट म्हणजे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचा जि. प. गट असून या गटात येणारी निम्मी गावे हे बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील, तर निम्मी गावे हे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील आहेत. विखे थोरात या दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव या गटावर आहे. या भागात बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्ते संच मोठा प्रमाणात आहे, तर स्वतः चे गाव, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा परिसरावर प्रभाव आहे. थोरात विखे एकत्र असो अथवा नसो २०१९ पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे थोरात कॉंग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.दोन्ही ठिकाणी अपक्षाची दाळ शिजली नाही. मात्र, विरोधाची मात्र ठिणगी पडली. ती कुठलाही कार्यक्रम असो एकमेकांवर टीका-टिपणी होत राहिली पुढे विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात कंबर कसली जोरदार संघर्ष झाला . अमोल खताळ बाणाने विखे पिता – पुत्राने थोरातांना घायाळ करत अखेर विधानसभेत चितपट केले . आता लक्ष वेधले ते जिल्हा परिषद , पंचायत समितीकडे मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्हयात जोरदार प्रयत्न होणार यात तीळमात्र शंका नाही. जोर्वे जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नसून विविध जाती- धर्माचे, सुशिक्षित व सधन लोक असून राजकारणाविषयी जाणकार असून हा बागयत भाग असताना सुद्धा विखे थोरातांच्या भोवती वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्ते निर्माण केले.

दोन्ही विधानसभेच्या सीमेवरील ही गावे आहेत. विकासात्मक कामे चढाओढीने होताना दिसत आहे. काही दिवसातच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेकांची इच्छा दिसून येत आहे. मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल सांगता येत नाही. थोरात गटाकडून संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, युवा नेते सुरेशराव थोरात, विनायकराव थोरात, आण्णा जगनर , पानोडी उपसंरपच विक्रम थोरात , संतोष नागरे , संजय खरात , विखे गटाच्या मालुंजेचे सरपंच संदीपराव घुगे, जोर्वे येथील गोकूळ दिघे भाजप जिल्हा सचिव सचिन शिंदे, शिवाजीराव कोल्हे, अशोक तळेकर, दिलीप इंगळे, कोंडाजी कडनर यांच्या व्यतिरिक्त रिपाइंचे आशिष शेळके , सरूनाथ उंबरकर , रासप पक्षाकडून सोपान तांबडे , एल्गार आदीवाशी पक्ष अनिल बर्डे या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्या असून आपापल्या परीने फिडींग लावण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र, परिसरात लोकांच्या होणाऱ्या चर्चेतून मात्र थोरात व विखे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण हा ओपन अथवा प्रवर्ग पुरुष निघाल्यास भास्कर खेमनर (अंभोरे, थोरात गट) तर संदिप घुगे (मालुंजे, विखे गट) या दोन आक्रमक माजी संरपंचामध्ये ही लढत निश्चित होणार असल्याची परिसरात जोरदार चर्चा होताना जरी दिसत असली तरी या गणात धनगर समाज फॅक्टरमुळे व नातेगोत्यामुळे बुवाजी पुणेकरांच्या वलयाच्या माध्यमातून ओझरच्या सोसायटी माजी चेअरमन राहुल खेमनर यांनी तयारी सुरु केल्याचे चित्र दिसून आण्णा जगनर हे सुध्दा इच्छुक दिसत आहे . तर डिग्रस संरपच अशोक खेमनर यांच्यासह ॲड संदिप खेमनर , संपत खेमनर , नवनाथ वावरे हे सुध्दा विखे गटाकडून इच्छुक असल्याने संगमनेर मधून विधानसभेला परिवर्तन घडल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे असल्या तरी डॉ सुजय विखे पाटील यांच्या निर्णयावर सर्व काही अलबेल आहे असल्याने महायुतीच्या मोठया यशामुळे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे . तर कॉग्रेस गटाकडून रणजितसिंह देशमुख यांच्या नावाला तरुणांची मोठी मागणी होताना दिसत आहे .

